Har Ghar Tiranga : PM Modi यांनी बदलले सोशल मीडिया अकाउंट्सचे डीपी, देशवायीसांनाही आवाहन

PM Narendra Modi: या मोहिमेत देशातील जनतेनेही मोठ्या संख्येने चळवळीच्या रूपाने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Prime Minister Narendra Modi Changed Profile Picture of His Social Media Accounts to 'Tricolor'
Prime Minister Narendra Modi Changed Profile Picture of His Social Media Accounts to 'Tricolor'Dainik Gomantak
Published on
Updated on

Prime Minister Narendra Modi Changed Profile Picture of His Social Media Accounts to 'Tricolor':

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटचे प्रोफाइल पिक्चर बदलून राष्ट्रध्वज 'तिरंग्या'चे चित्र ठेवले आहे.

तिरंगा सण साजरा करण्यासाठी देशातील जनतेनेही यामध्ये चळवळीच्या रूपाने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

"हर घर तिरंगा मोहिमेत देशातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी रविवारी केले. आपल्या सोशल मीडिया अकाउंटचे प्रोफाइल पिक्चर बदलूया आणि या अनोख्या मोहिमेला पाठिंबा देऊया. ज्यामुळे आपला प्रिय देश आणि आपल्यातील बंध अधिक घट्ट होतील." असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले आहे.

Prime Minister Narendra Modi Changed Profile Picture of His Social Media Accounts to 'Tricolor'
चीन-पाकिस्तानला रोखण्यासाठी भारताचे Heron Mark 2 देणार पहारा

गृहमंत्र्यांनी दाखवला ग्रीन सिग्नल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी अहमदाबादमध्ये 'हर घर तिरंगा' मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला.

ते म्हणाले की, आझादी का अमृत महोत्सवादरम्यान पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात देशभक्तीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 'आझादी का अमृत महोत्सव' (Azadi Ka Amrit Mahotsav) 15 ऑगस्ट 2023 रोजी संपणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षापासून ते 100 वर्षांपर्यंत आपण भारताला प्रत्येक क्षेत्रात महान बनवण्यासाठी जगू.

काय आहे हर घर तिरंगा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करणाऱ्या 'आझादी का अमृत महोत्सवा'च्या निमित्ताने गेल्या वर्षी २२ जुलै रोजी 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) मोहीम सुरू केली होती.

Prime Minister Narendra Modi Changed Profile Picture of His Social Media Accounts to 'Tricolor'
Jadavpur University: "आई मला भीती वाटतेय, प्लिज लवकर ये"; बिल्डिंगवरुन पडण्यापूर्वी विद्यार्थाचा फोन

15 तारखेपर्यंत प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात 'हर घर तिरंगा' साजरा केला जाणार आहे.

यामध्ये लोकांना घरोघरी झेंडे फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. या मोहिमेचा व्यापक प्रसार आणि लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग निश्चित करण्यासाठी आजपासून खासदार आणि मंत्र्यांसह 'तिरंगा' बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बाइक रॅली इंडिया गेट (India Gate) सर्कलवर पोहोचेल. त्यानंतर इंडिया गेट कॉम्प्लेक्समार्गे मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे रॅलीची सांगता होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com