State Transport Corporation Dainik Gomantak
महाराष्ट्र

आज मध्यरात्रीपासून 'लालपरीचा' प्रवास महागणार!

मात्र या तिकीट दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार असल्याने त्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे.

दैनिक गोमन्तक

देशात आणि राज्यात दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel) किमती नवा उच्चांक गाठत आहेत. दुसरीकडे महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण बनले आहे. अशा अनेक कारणांमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport Corporation) लालपरीच्या तिकीटामध्ये पुन्हा एकदा सोमवारी मध्यरात्रापासून वाढ करण्यात आली आहे. मात्र या तिकीट दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार असल्याने त्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनामुळे (Covid 19) राज्य परिवहन महामंडळाची एसटी बससेवा ठप्प झाली होती. त्यामुळे महामंडळाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. आता राज्य अनलॉक झाल्यानंतर एसटी पुन्हा एकदा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र एसटी बस बंद झाल्याने उत्पन्नात मोठ्याप्रमाणात घट झाली होती. त्यामुळे तब्बल 12 हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला असताना वाढते पेट्रोल-डिझेलचे दर, टायरचे दर, कर्मचाऱ्यांचे वेतन अशा अनेक कारणांमुळे महमंडळ आर्थिक कोंडीत सापडले आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाकडून 17 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत तिकीटाच्या दरामध्ये वाढ होणार असल्याचे सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT