महाराष्ट्र

Sindhudurg News: स्वच्छ सर्वेक्षणात सिंधुदुर्गचा राज्यात पहिला, पश्चिम भारतात दुसरा क्रमांक

गोमन्तक डिजिटल टीम

स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याने बाजी मारली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने स्वच्छ सर्वेक्षणात (Swachh Survekshan) सिंधुदुर्गचा राज्यात पहिला, पश्चिम भारतात दुसरा क्रमांक पटकावला आहे. देशातील 17 हजार 450 गावे आणि 698 जिल्ह्यांमधून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची निवड करण्यात आली आहे. दिल्ली इथे विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ग्रामीण भागात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले होते. देशातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, धार्मिक स्थळं, बाजाराची ठिकाणं यांची पडताळणी करण्यात आली होती. या मूल्यमापनात सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल राहिला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल, केंद्रीय सचिव सर्वेक्षण सुरु केलं.

यापूर्वी 2016-17 या वर्षात केंद्राने देशात स्वच्छ जिल्हा स्पर्धेत सिंधुदुर्गने जिल्हा पठारी भागात देशात पहिला क्रमांक पटकावला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याने केंद्र शासनाच्या हागणदारी मुक्त अभियानात आशिया खंडात सर्वात प्रथम पूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त होण्याचा मान मिळवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT