Goa Maharashtra Liquor: गोव्यातून महाराष्ट्रात दारू आणताय? 'या' कायद्याअंतर्गत होणार सक्त कारवाई

गोव्यातून महाराष्ट्रात अवैध मद्याची तस्करी करण्याचं प्रमाण वाढलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Goa Maharashtra Liquor
Goa Maharashtra LiquorDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा व कर्नाटक राज्यातून (Goa & Karnataka) होणारी अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत. यापुढे गोव्यातून महाराष्ट्रात मद्य आणल्यास दोषींवर मकोकाअंतर्गत (MCOCA) कारवाई केली जाणार आहे. उत्पादन शुल्क मंत्री शभूराज देसाई यांनी यासंबंधी कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

Goa Maharashtra Liquor
Meat Shortage in Goa : मांसटंचाईमुळे कर्नाटकातून गोव्यात बेकायदा आयात

गोव्यातून महाराष्ट्रात अवैध मद्याची तस्करी करण्याचं प्रमाण वाढलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावर कर्नाटक व गोवा राज्यातून होणारी अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी कडक तपासणी सुरु करा. गोवा आणि सिंधुदूर्गला जोडणाऱ्या छोट्या रस्त्यांवरही तात्पुरत्या स्वरुपात चेकपॉइंट्स उभारा. तसेच, तस्करी करणाऱ्यांविरोधात प्रस्ताव तयार करून पोलीस प्रशासनाला पाठवण्याची सूचना देसाई यांनी अधिकाऱ्यांना केली.

Goa Maharashtra Liquor
Pandurang Raut Passed Away: गोव्याचे माजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन

मद्याच्या दरात मोठी तफावत असल्याने गोव्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणार मद्याची तस्करी होते. लॉकडाउनच्या काळात मद्याची दुकानं बंद होती, तरीही गोव्यातून महाराष्ट्रात मद्य नेले जाते होते. रस्तेमार्ग मद्य नेण्यासाठी गोव्यातील मद्य दुकानांचे मालक ग्राहकांना व्हिजिटर्स परमिट देत असतात. पण हे परमिट काही राज्यं आणि केद्रशासित प्रदेशांमध्येच वैध आहे.

महाराष्ट्रात व्हिजिटर्स परमिटला काहीच आधार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. कायद्यानुसार गोव्यातून महाराष्ट्रात दारुची एक बाटलीही आणली जाऊ शकत नाही. गोव्यातील मद्य दुकानांचे मालक नफा कमावण्याच्या हेतूनेच हे परिमट देत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे यापुढे गोव्यातून महाराष्ट्रात मद्य घेऊन जात असाल तर वेळीच सावध व्हा, नाहीतर कारवाई अटळ आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com