Sawantwadi Gambling Raid Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sawantwadi Gambling Raid: सिंधुदुर्ग पोलीस ॲक्शन मोडवर सावंतवाडीतील 4 मटका-जुगार अड्ड्यांवर धाड; 8 जणांवर कारवाई

Sindhudurg police action: मंगळवारी (९ सप्टेंबर) सावंतवाडी पोलिसांनी मटका जुगारावरील कठोर कारवाई करत चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले.

Sameer Amunekar

सावंतवाडी: मंगळवारी (९ सप्टेंबर) सावंतवाडी पोलिसांनी मटका जुगारावरील कठोर कारवाई करत चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण आठ संशयितांना गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक आणि पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे केली.

सांगेली बाजारात संदीप सखाराम लाड हा मुंबई मटका जुगाराचे आकडे मोबाईलवर घेताना पकडला गेला. त्याच्याकडून १,२५० रुपये रोख रक्कम आणि १०,००० रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला. तपासात उघडकीस आले की, संदीप लाड हे आकडे सावंतवाडी येथील सुनील आडीवरेकर याला पाठवत होते. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मळेवाड-जकात नाका येथे आनंद यशवंत नाईक (वय ६२) हा कल्याण मटका जुगाराचे आकडे घेताना आढळला. त्याच्याकडून २,४३० रुपये रोख जप्त करण्यात आले. तसेच, महेश रमाकांत परब (वय ५२), मूळचा शिरोडा येथील रहिवासी, मळेवाड येथे मोबाईलवर कल्याण मटकाचे आकडे घेताना पकडला गेला.

त्याच्याकडून २,५२० रुपये रोख रक्कम आणि ७,००० रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला. तपासात समजले की, तो हे आकडे सावंतवाडी येथील हनु देऊलकर याला पाठवत होता, त्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोंदा येथील मच्छी मार्केटजवळ अमोल प्रभाकर विर्नोडकर (वय ४८) हा कल्याण मटका जुगाराचे आकडे घेताना पकडला गेला. त्याच्याकडून ३४० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने हे आकडे गोव्यातील हरमल येथील राजेंद्र धर्माजी रेडकर याला पाठवत असल्याचे सांगितले. या दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, एएसआय परब, एएसआय अरवारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय भोसले, हवालदार खंडे आणि प्रकाश कदम यांच्या पथकाने केली. या कठोर कारवाईत मटका जुगाराविरुद्ध पोलिसांनी आपली तत्परता दाखवली असून पुढील तपास सुरू आहे.

बेकायदेशीर धंदे मोडून काढावेत...

दुसरीकडे, निलेश राणेंनी एसपी - जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत अमली पदार्थ बेकायदा धंद्यांबाबत चर्चा केली. जिल्ह्यात गोवा बनावटीची दारू आणि ड्रग्जची तस्करी दिवसेंदिवस वाढत आहे

या बेकायदेशीर धंद्यामुळे तरुण पिढीच्या आरोग्यावर आणि भविष्यात थेट परिणाम होत असून, समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग पोलिसांनी ठोस आणि कठोर पावले उचलून हे सर्व बेकायदेशीर धंदे मोडून काढावेत, असं आवाहन निलेश राणे केलंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT