Dead body found in Tilari canal Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sindhudurg Crime News: अंगावर जखमांच्या खुणा, अर्धनग्न अवस्था अन् गोधडीत गुंडाळलेला मृतदेह; तिलारी कालव्यात सापडलेल्या मृतदेहाने खळबळ, घातपाताचा संशय

Tilari Canal Dead Body: इन्सुली-डोबाशेळ परिसरातील तिलारी कालव्यात एका अनोळखी वृद्ध पुरुषाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Sameer Amunekar

बांदा : इन्सुली-डोबाशेळ परिसरातील तिलारी कालव्यात एका अनोळखी वृद्ध पुरुषाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह अर्धनग्नावस्थेत गोधडीत आढळल्याने ग्रामस्थांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

मात्र, प्राथमिक पाहणीत हा घातपाताचा प्रकार नसून संबंधित व्यक्ती स्वतःच कालव्यात कोसळली असावी, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेहावर आढळलेल्या जखमा कालव्यात पडल्यामुळे झाल्या असाव्यात, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, या प्रकरणातील नेमके सत्य शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

कालव्यात तरंगताना दिसला मृतदेह

तिलारी कालव्याच्या पाण्यात मृतदेह तरंगताना स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. मृतदेहाची अवस्था पाहून ग्रामस्थांना संशय आला आणि त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेहाची परिस्थिती आणि घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

मृतदेह गोधडीत असल्याने संशय वाढला

मृतदेह अर्धनग्नावस्थेत गोधडीत आढळल्याने ग्रामस्थांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. संबंधित वृद्धाचा अन्यत्र घातपात करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी मृतदेह कालव्यात आणून टाकला असावा, अशी शक्यता काही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

विशेषतः मृतदेहाची अवस्था आणि त्याच्यासोबत गोधडीत मृतदेह आढळणे यामुळे या घटनेबाबत संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

पोलिसांचा प्राथमिक अंदाज

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सध्या घातपात झाल्याचे स्पष्ट संकेत मिळालेले नसल्याचे सांगितले आहे. संबंधित व्यक्ती त्या ठिकाणी मद्यपान करण्यासाठी बसली असावी आणि त्यानंतर तोल जाऊन कालव्यात कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कालव्यात पडल्यामुळे मृत व्यक्तीच्या अंगावर जखमा झाल्या असण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे केवळ जखमा किंवा मृतदेहाची अवस्था पाहून घातपाताचा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मात्र, मृतदेह अर्धनग्न अवस्थेत का आढळला? त्याच्यासोबत गोधडी कशी आली? संबंधित व्यक्ती नेमकी कालव्यात कशा परिस्थितीत पडली? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. त्यामुळे या घटनेबाबत ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत असलेला घातपाताचा संशय पूर्णपणे दुर्लक्षित करता येणार नसल्याचे चित्र आहे.

पोलिसांकडून या सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास केला जात आहे. घटनास्थळाचा पंचनामा, मृतदेहाची ओळख आणि शवविच्छेदन अहवाल यामधून तपासाला महत्त्वाची दिशा मिळण्याची शक्यता आहे.

शवविच्छेदन अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होणार

या प्रकरणातील मृत्यूचे नेमके कारण काय, मृतदेहावर जखमा कशामुळे झाल्या आणि हा अपघात आहे की घातपात, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अहवाल प्राप्त होईपर्यंत पोलिसांकडून कोणत्याही शक्यतेवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.

सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून या रहस्यमय मृत्यूमागील नेमके कारण समोर येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT