Hasan Mushrif & Kirit Somaiya  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Hasan Mushrif ED Raid : एकदाच आम्हाला गोळ्या घाला; ईडीच्या छाप्यानंतर मुश्रीफांच्या पत्नीचा उद्वेग

कागलमधील घरावर ईडीकडून तिसऱ्यांदा छापेमारी; घराबाहेर समर्थकांची गर्दी

Akshay Nirmale

Hasan Mushrif ED Raid : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे. यावेळी मुश्रीफांच्या पत्नीने उद्गवेगाने कितीवेळा येतात आणि त्रास देतात, एकदाच काय ते गोळ्या घाला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मुश्रीफांच्या पत्नी म्हणाल्या की, किती वेळा येतात? काही आहे की नाही? एकदाच गोळ्या घालून जायला सांगा. किती त्रास द्यायचा? रोज उठून तेच सुरू आहे, एवढं काम करणारा माणूस आहे, रात्रंदिवस जनतेसाठी राबणारा माणूस आहे आणि असं का करता? आम्ही करायचं तरी काय? असा सवालही त्यांनी केला.

शनिवारी सकाळी ईडीचे पथक मुश्रीफ यांच्या निवासस्थानी पोहचले आणि त्यांनी छापेमारी सुरू केली. दरम्यान, आज हसन मुश्रीफ कागलमध्ये येणार हे माहीत असल्याने त्यांचे समर्थक तसेच कार्यकर्ते त्यांच्या समस्या घेऊन निवासस्थानी जमा झाले होते.

त्यांना ईडीने कारवाई सुरु केल्याचे समजताच ते संतप्त झाले. गेल्या काही दिवसांपासून मुश्रीफ ईडीच्या रडारवर असल्याने कार्यकर्ते संतापले आहेत.

दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर हसन मुश्रीफ ईडीच्या रडारवर आहेत. यापूर्वी 11 जानेवारी रोजी ईडीने मुश्रीफांव छापा टाकला होता. त्यानंतर 21 दिवसांनी ईडीने ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्यालयासह कागल तालुक्यातील सेनापशी कापशी आणि गडहिंग्लज तालुक्यातील हरळी शाखेवर छापेमारी केली होती.

हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुरगूड पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरून मुश्रीफांना दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"सद्या श्रावण सुरु आसा, हांवूंय नुस्ते खायना" मासे निर्यातीवरून LOP आलेमाव आणि CM सावंतमध्ये रंगला कोकणी संवाद; Watch Video

Sunburn Festival 2025: 17 वर्षांनी गोव्याला रामराम, यंदाचा 'सनबर्न' होणार मुंबईत; तारखा जाहीर!

Goa Assembly Live: खाणकामावर स्पष्ट अन्याय होत आहे

Goa Assembly:‘मी पत्रकार असतो तर ...’ सरदेसाईंच्या मिश्किल प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा; Watch Video

Mohammed Siraj: 'मी बोल्ड करतो, तेंव्हाच सेलिब्रेशन करतो'! टीका करणाऱ्या इंग्लंडच्या चाहत्यांवर सिराजचा बाऊन्सर

SCROLL FOR NEXT