Shivshahir Babasaheb Purandare Dainik Gomantak
महाराष्ट्र

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक

बाबासाहेबांनी नुकतेच वयाच्या शंभराव्या वर्षांत पदार्पण केले.

दैनिक गोमन्तक

शिवचरीत्र उभ्या महाराष्ट्रामध्ये घराघरात पोहोचवणाऱ्या आपल्या वक्तृत्वाने मराठी माणसांना त्यांच्यात वीरश्री अन राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवण्याचा तब्बल साठहून अधिक वर्षे प्रयत्न करणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजन असून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कोरोनाची महामारीच्या काळात बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यानांच्या आणि अन्य कामांमुळे देशा-परदेशात भ्रमंती सुरु होती. बाबासाहेबांनी नुकतेच वयाच्या शंभराव्या वर्षांत पदार्पण केले.

रुग्णालय प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले की, बाबासाहेब (Babasaheb) गेल्या आठवडापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल असून त्यांना न्युमोनियाची लागण झाली आहे. अजून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

बाबासाहेबानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवर (Shivaji Maharaj) राजा शिवछत्रपती ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्या ग्रंथास चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. केवळ महाराष्ट्रात नाहीतर देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे चाहते आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात बाबासाहेबानी लिहिलेले शिवचरित्र यांची चर्चा असते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यत सर्वांनी शिवचरित्राचे पारायण केले. बाबासाहेब हे शिवव्याख्याते म्हणून त्यांची लोकांना ओळख झाली. आणि त्यांच्या शिवचरित्राला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT