Shivsena slams on BJP through Samana news paper asking on Mamata Banerjee Mumbai tour  Dainik Gomantak
महाराष्ट्र

ममता बॅनर्जी मुंबईत यात गैर काय ?, सामनातून सेनेचे भाजपवर ताशेरे

मुंबईचे आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र रातोरात अहमदाबादला ओढले गेले. त्यावेळेसही भाजपचे नेते गप्प राहिले मग ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावरून गदारोळ का?

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) मंगळवारी मुंबईत आल्या होत्या. आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात त्यांनी अनेक नेत्यांची भट घेतली होती त्यासह त्यांनी उद्योगपतींची बैठक देखील बोलावली होती. या साऱ्या उद्योगपतींना ममतांनी बंगालला येण्याचे निमंत्रण दिले आहे . त्यावरून महाराष्ट्र भाजपने (BJP) सरकारवर टीकेची झोड उठवली होती. आमदार आशिष शेलार यांनी ममाताजी एका षड्यंत्राखाली मुंबईत आल्या असून शिवसेना त्यांना या कटात साथ देत असल्याचा थेट आरोप सेनेवरती केला होता. उद्योगपतींना भेटून ममता बॅनर्जी यांना महाराष्ट्रातील उद्योग आणि रोजगार बंगालमध्ये घेऊन जायचे आहेत असं देखील भाजपने आरोप केले होते. आता भाजपच्या या आरोपांना शिवसेनेच्या अग्रलेखातून प्रतिउत्तर देण्यात आले आहे. (Shivsena slams on BJP through Samana news paper asking on Mamata Banerjee Mumbai tour)

शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या 'सामना'मध्ये लिहिलेल्या लेखात महाराष्ट्र भाजपला विचारले आहे की, 'उद्योगपतींना भेटण्यासाठी मुंबईत येण्यात गैर काय? मुंबई ही देशाची औद्योगिक आणि आर्थिक राजधानी आहे. देशाच्या तिजोरीत एकट्या मुंबई शहराचे 2.25 लाख कोटी रुपयांचे योगदान आहे.मुंबई देशाचे पोट भरते हे विसरता येणार नाही. ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य करणारे भाजप नेतृत्व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मुंबईतील गोंधळावर आक्षेप घेण्यास का तयार नाहीत असा थेट सवाल केला आहे.

संजय राऊत यांनी विचारले, 'ममता बॅनर्जींनंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल त्यांच्या अर्ध्या मंत्रिमंडळासह मुंबईत आले. मुंबईतील उद्योगपतींना 'व्हायब्रंट गुजरात' साठी गुजरातमध्ये येण्याचे निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. गुजरातला स्वावलंबी बनवण्यासाठी मुंबईतील उद्योगपतींची मदत हवी आहे. म्हणजे गुजरातचा औद्योगिक विकास आणि अर्थव्यवस्था मुंबईवर अवलंबून आहे. पटेल उद्योगपतींना भेटायला मुंबईत यायला हरकत नाही, पण ममतादीदींनी उद्योगपतींना भेटायला काय हरकत आहे?'

'योगी आदित्यनाथ चित्रपट उद्योगाला मुंबईहून लखनऊला घेऊन जाण्यासाठी आले होते. यावरही भाजपने कोणताही आक्षेप घेतला नाही. मुंबईचे आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र रातोरात अहमदाबादला ओढले गेले. त्यावेळेसही भाजपचे नेते गप्प राहिले मग ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावरून गदारोळ का? अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT