Shivsena secretary Milind Narvekar appointed as a member of the Tirumala Tirupati Devasthanams Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आता तिरूपती देवस्थानच्या ट्रस्टवर

यादीत महाराष्ट्रातून शिवसेना (Shivsena) सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची नियुक्त करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या (Tirumala Tirupati Devasthanams Trust) सदस्यांची यादी आंध्रप्रदेश सरकारकडून (Andhra Pradesh Government) जाहीर करण्यात आली आहे. या यादीत देशभरातून 24 नावांचा समावेश करण्यात आला आहे. या 24 नावांमधून एक नाव महाराष्ट्रातूनही (Maharashtra) आले आहे. या यादीत महाराष्ट्रातून शिवसेना (Shivsena) सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची नियुक्त करण्यात आले आहे. देवस्थानच्या सदस्यपदी त्यांची नेमणूक झाली आहे. देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित असे आंध्रप्रदेशातील तिरूमला येथील तिरुपती देवस्थानाची ओळख आहे. (Shivsena secretary Milind Narvekar appointed as a member of the Tirumala Tirupati Devasthanams)

या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ असते.या देवस्थानच्या पदाधिकारी नेमणुकीचा अधिकार आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना असतो त्यासाठी ते साऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतात. प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधून आपल्या राज्यातून नाव असतात. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरून संवाद साधुन महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांच नाव सुचवलं होत आणि आता त्यांची अधिकृत नेमणूक करण्यात आली आहे.

आंध्रप्रदेश सरकारने काल अधिकृत अधिसूचना काढत, तिरूमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केली असून या निवडीनंतर आता देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून, मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती झाली असल्याने शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर याचे वलय आता देश पातळीवर विस्तारल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Javier Siverio: 'हमखास गोल नोंदविणारा खेळाडू'! स्पॅनिश हावियर FC Goa टीममध्ये; प्रशिक्षक मार्केझनी केले कौतुक

Goa Third District: 'तिसऱ्या जिल्ह्यात काणकोण नकोच! निर्णय लादल्यास रस्त्यावर उतरणार'; स्थानिक आक्रमक

Atal Patrol Ship: खोल समुद्रात स्वदेशी 'अटल' घालणार गस्त! गोवा शिपयार्डतर्फे 6वे द्रुतगती जहाज; आणखी 12 जहाजांचे जलावतरण होणार

Goa Job Scam: 20 लाख घेतात, अमेरिकेत नोकरीचे आश्वासन देतात; गोव्यातील तरुणांची होतेय फसवणूक, आमोणकरांनी मांडली व्यथा

Goa University: ‘चोरीचा अहवाल फुटला कसा?’ विद्यापीठ शिक्षक संघटनेच्या बैठकीत 4 तास खल

SCROLL FOR NEXT