राज्यसभा निवडणुकीला अवघे सात दिवस बाकी असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अपक्ष आमदार आपल्याकडे कसे राहतील यासाठी शिवसेना आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातच निवडणुकीसाठी घोडेबाजारचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावरुन शिवसेना नेत संजय राऊत यांनी ईडीने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. (ShivSena leader Sanjay Raut criticizes BJP)
याबाबत बोलताना राऊत म्हणआले की, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाईट पद्धतीने घोडेबाजार सुरू आहे. यासाठी राजकारणात पैसा येतो कुठून ? याचा तपास ईडीने करावा आमदारांना अमिष दाखवत त्यांना विकत घेण्यासाठी पैशाची प्रलोभन दाखवली जात आहेत. ही प्रलोभन दाखवणारे कोण आहेत ? कोटी कोटी रुपयांचे आकडे मी ऐकत आहे. त्यामागचे सूत्रधार कोण आहेत ? केंद्रीय तपास यंत्रणेने त्याचा अभ्यास करणं गरजेच आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.
राज्यसभा बिनविरोध होण्यासाठी म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं, यावेळी ते म्हणाले की, विरोधी फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. आधीच राज्यातील राजकीय वातावरण गढूळ आणि प्रदूषित झालं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने हे वातावरण अधिक बिघडण्याची शक्यता वाटत आहे. विरोधी पक्ष नेत्यांना भेटून राज्याच्या प्रतिष्ठेसाठी काही चांगले होणार असेल तर त्याचं स्वागत सर्वांनी केले पाहिजे, असे राऊत म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.