Sambhaji Bhide Guruji News dainikgomantak
महाराष्ट्र

Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांचे डॉक्टरांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, म्हणाले...

दैनिक गोमन्तक

अमरावती : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide Guruji) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सदा चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा एकदा असेच वादग्रस्त विधान केले असून हे आक्षेपार्ह विधान डॉक्टरांबाबत केले आहे. याच्याआधी त्यांनी न्यायाधीशांवर वादग्रस्त विधान केले होते. यावेळी भिडे यांनी, डॉक्टर हे लुटारु आहेत, ते मारायच्या लायकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर भिडे यांच्या या वक्तव्यामुळे डॉक्टरांमध्ये नाराजीचा सुर उमटत असून डॉक्टरांच्या संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. (Shivprathishthan hindustan Sambhaji Bhide controversial remark on doctors)

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे अमरावती (Amravati) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी, डॉक्टर (doctors) हे लुटारु आहेत, ते मारायच्या लायकीचे आहेत असे वक्तव्य केलं होतं. तसेच कोरोना (corona) काळात लोकांचा फक्त भीतीनेच मृत्यू झाला असा दावा भिडेंनी केला. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहे, डॉक्टर मारायच्या लायकीचे असून त्यांच्याकडे कधीही जाऊ नका, असे अपशब्द त्यांनी वापरले. भिडे यांच्या या वक्तव्यामुळे डॉक्टरांमध्ये नाराजी असून डॉक्टरांच्या संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी या आधीदेखील कोरोनाबाधितांबाबत वक्तव्य केले होते. ज्यांना कोरोना होतोय, ते जगायच्या लायकीचे नसल्याचे भिडे यांनी म्हटले.

याच्याआधी भिडे यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. तर त्यांनी न्यायाधीशांविरोधात ही चिथावणीखोर वक्तव्य केली होती. लिव्ह इन रिलेशनशीप अयोग नाही, असं म्हणणाऱ्या न्यायालये (Courts) देखील वैध नाहीत, अशा न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवले पाहिजे, असे भिडे यांनी म्हटलं होतं.

तर महाराष्ट्र सरकारच्या (Maharashra Goverment) किराना दुकानात वाईनला (wine) परवानगी या विषयावरही त्यांनी तोंडसुख घेत सरकारच्या निर्णयावरुनही हल्लाबोल केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT