MLA Ravi Rana DainiK Gomantak
महाराष्ट्र

''रोक सके तो रोक लो'', 'आम्ही मातोश्रीवर जाणारच': आमदार रवी राणा

मात्र आज राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण मागील दिवसांपासून हनुमान चालिसा आणि लाऊडस्पीकर मुद्यावरुन चांगलचं गाजत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वासंबंधी भूमिका मांडल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली होती. यातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी शुक्रवारी सांगितले होते की, ''शिवसेनेची (Shiv Sena) नाराजी आणि मुंबई पोलिसांच्या नोटीसला न जुमानता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या निवास्थानाबाहेर उद्या 9 वाजता हनुमान चालिसाचं पठन करणार आहोत.'' मात्र आज राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

दुसरीकडे रवी राणा म्हणाले, ''आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानाबाहेर जाणार आणि हनुमान चालिसाचं पठण करणार. शिवसैनिक गुंडागर्दी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यंत्री उध्दव ठाकरे कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही घराबाहेर पडणार आहोत, आणि सुखशांतीसाठी हनुमान चालिसाचं पठण करणार आहोत.''

दरम्यान, वांद्रे उपनगरातील मुख्यमंत्र्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे राणा दाम्पत्याने म्हटले आहे. पोलिसांनी 'मातोश्री' बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तत्पूर्वी, मुंबई पोलिसांनी (Police) शुक्रवारी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून नोटीस बजावली आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केला : मोहित कंबोज

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर कॉलनीजवळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गाडीवर हल्ला केल्याचा दावा स्थानिक भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. दुसरीकडे, रवी राणा यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की, "महाराष्ट्राला संकटातून मुक्त करण्यासाठी आणि राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान जयंतीला हनुमान चालिसाचे पठण करावे, अशी आम्ही मागणी करतो. परंतु शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यास नकार दिला.'' राणा पुढे म्हणाले, "आम्ही उद्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार आहोत. या दरम्यान आम्ही पोलिसांना सहकार्य करु. मी माझ्या कार्यकर्त्यांना मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. पोलिसांनी आणि लोकांना त्रास होऊ नये.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT