संजय राऊत म्हणजे 'पोपटचं', नवनीत राणांची राऊतांवर बोचरी टीका

महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण मागील दिवसांपासून हनुमान चालिसा आणि लाऊडस्पीकर मुद्यावरुन चांगलचं गाजत आहे.
Navneet Rana & Ravi Rana
Navneet Rana & Ravi RanaDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील राजकारण मागील दिवसांपासून हनुमान चालिसा आणि लाऊडस्पीकर मुद्यावरुन चांगलचं गाजत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वासंबंधी भूमिका मांडल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली होती.

दरम्यान, शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप यांच्यात या मुद्यावरुन खडाजंगी झाली. राज ठाकरे भाजपच्या गोटातील एक घटक असल्याचे म्हणत शिवसेना नेत्यांनी राज ठाकरेंना आपल्या निशाण्यावर घेतले होते. यातच नवनीत राणा आणि पती रवी राणा यांनी शिवसेनेवर हनुमान चालिसाच्या मुद्यावरुन निशाणा साधला होता. आता राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर निशाणा साधला. खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हल्ला केला. राऊत म्हणजे केवळ पोपट आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नसल्याचे म्हणत नवनीत राणा यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

Navneet Rana & Ravi Rana
नवाब मलिक यांना मोठा धक्का, SC ने फेटाळली याचिका

नवनीत राणा म्हणाले, ''आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही महाराष्ट्र (Maharashtra) सरकारला हनुमान चालिसा पठनासंबंधी विनंती केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भात येत नाहीत. शेतकऱ्यांनी मदत करत नाही. महाराष्ट्रावर सध्या कोरोनासारखं संकट आहे. उद्या आम्ही रात्री 9 वाजता मातोश्रीवर हनुमान चालिसेचं पठणं करणार आहोत. मुंबईकरांना आमच्या हनुमान चालिसा पठनाचा कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ. पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करुन हनुमान चालिसाचं आम्ही पठण करणार आहोत.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com