Uddhav Thackeray

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

शिवसेना कधीही पूर्ण न होणारी आश्वासने देणार नाही: उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह मंत्री अमित शहांबाबत वक्तव्य केलं आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. अशा स्थितीत सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. विरोधक व सत्ताधाऱ्यांमद्धे शाब्दिक युद्ध सुरू आहे. यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गृह मंत्री अमित शहांबाबत वक्तव्य केलं आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांवर निशाणा साधत ठाकरे म्हणाले, सध्या असे अनेक नेते आहेत जे निवडणुकीच्या वेळी सर्वसामान्यांना चंद्र-तारे आणून देण्याचे आश्वासन देतात आणि नंतर आश्वासने विसरतात. तुम्ही चंद्र-ताऱ्यांचे आश्वासन दिले, असे लोक विचारतात तेव्हा हे नेते म्हणतात, निवडणुकीच्या वेळी अशा गोष्टी बोलल्या जातात. मात्र शिवसेनेचे तसे नाही. माझ्या पक्ष कधीही पूर्ण न होणारी आश्वासने देणार नाही.

ते पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) आम्हाला खोटे बोलण्याची शिकवण दिलेली नाही. फक्त निवडणूक (Election) जिंकण्यासाठी खोटे बोलू नका, असे ते म्हणत. हाच वारसा शिवसेना (Shivsena) चालवत आहे. तुम्ही आश्वासने पाळली नाहीत तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत.

महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीवर बोलताना उद्धव म्हणाले, येत्या काही दिवसांत गरज पडली तर मी कोरोनाच्या परिस्थितीबद्दल बोलेन. काळजी करू नका आम्ही परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहोत. फक्त तुमचा पाठिंबा आमच्या सोबत ठेवा. उद्धव ठाकरे अनेक अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलत होते.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, राज्यातील 10 मंत्र्यांसह 20 हून अधिक आमदार तपासात कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात कोविडची प्रकरणे अशीच वाढली, तर सरकार आणखी कठोर निर्णय घेऊ शकते. महाराष्ट्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे की, कोरोनाचा वेग पाहता जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात दोन लाख सक्रिय रुग्ण होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT