Maharashtra Politics Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरे, शिंदे गटाला कोणतं नवं चिन्ह अन् नाव मिळणार? अवघ्या राज्याचे लक्ष

Maharashtra Politics Crisis: महाराष्ट्रात जेव्हापासून एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. तेव्हापासून राजकारणात अनेक नवनवे वळण पाहायला मिळत आहे. बंडानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. आता शिवसेनेच्या चिन्हावरून गदारोळ सुरू आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. दोन्ही गटांना आता पक्षाचं नावही वापरता येणार नाही. दोन्ही गटांना वेगवेगळी निवडणूक चिन्हं आणि नाव निवडावी लागणार आहेत. दोन्ही गटांनी आपले पर्याय निवडणूक आयोगासमोर (Election Commission Of India) सादर केले असून सर्व राज्याचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

शिंदे गटाचे तीन पर्याय

धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाला आज दुपारी 1 वाजेपर्यंत चिन्ह आणि नावांचे पर्याय द्यावे लागणार आहेत. शिंदे गटाकडून तुतारी, गदा आणि तलवार या चिन्हाचे पर्याय दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यातच शिंदे गटाकडून तुतारी या चिन्हाला प्राधान्य असल्याची चर्चा आहे. तसंच पक्षाच्या नावात शिंदे गट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा उल्लेख ठेवणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे गटाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहितील दिलेली नाही. वर्षा बंगल्यावर काल रात्री झालेल्या बैठकीत या सर्व विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंत शिंदे गट आयोगाकडे कोणती चिन्हं आणि नावांचा पर्याय देणार याकडं लक्ष लागलं आहे.

ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेचे नवं नाव काय आणि या पक्षाचं निवडणूक चिन्हं कोणतं? याचा फैसला आज निवडणूक आयोग करणार आहे. ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी तीन आयोगाला सूचवण्यात आली आहेत. त्रिशूळ, मशाल आणि उगवता सूर्य अशी तीन निवडणूक चिन्हांचे पर्याय देण्यात आलेत. निवडणूक आयोग यातल्या कोणत्या पर्यायांवर शिक्कामोर्तब करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

40 डोक्यांच्या रावणानं प्रभू रामाचं शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवलं, जी शिवसेना तुमची आई आहे, तिच्या काळजात कट्यार घुसवली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला. काल म्हणजेच रविवारी उद्धव ठाकरेंनी सोशलल मीडियावरुन जनतेला शिवसैनिकांना संबोधित केले. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT