Shiv Sena And BJP Dainik Gomantak
महाराष्ट्र

पाडव्याच्या शुभेच्छा देत सेनेचा केंद्राला टोला

शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांमध्ये सातत्याने कलगीतुरा रंगताना आपल्याला पाहायला मिळतो.

दैनिक गोमन्तक

शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपा (BJP) या दोन पक्षांमध्ये सातत्याने कलगीतुरा रंगताना आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी कधीही सोडत नाहीत. राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण आणि निर्माण झालेली परिस्थिती या पार्श्वभूमीवर आज गुढी पाडव्याच्या (Gudi Padwa) निमित्ताने शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यावेळी केंद्रावर खोचक शब्दांत टीका देखील केली. देशात निर्माण झालेल्या महागाईच्या संकटावर यामध्ये निशाणा साधण्यात आलेला आहे. (Shiv Sena has criticized the central government)

राज्य सरकारची जनतेला‘पाडवा भेट’

“आज महाराष्ट्रातील जनताही करोनाचा (Corona) विनाश करून भयमुक्त आणि संकटमुक्त झालेली आहे. त्यात करोना काळात लावण्यात आलेले निर्बंध उठवून राज्यातील आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला ‘पाडवा भेट’च दिली आहे”, असं अग्रलेखात म्हटलं गेलं आहे.

मागाईवरून केंद्र सरकारवर टोला!

दरम्यान, पाडव्याच्या शुभेच्छा देतानाच महागाईवरून शिवसेनेने टोला लगावला आहे. “महाराष्ट्र आणि देशातील जनतेने करोनाच्या विषाणूवर विजय मिळवून आयुष्याच्या नवीन वाटचालीचा श्रीगणेशा सुरू केला असला तरी महागाईच्या सरकारनिर्मित विषाणूला तोंड कसे द्यायचे? याचे मात्र कुठलेही उत्तर जनतेला सापडताना दिसत नाहीये. निवडणुकीपुरती स्वस्ताईची गुढी उभारून निवडणुका संपल्यावर महागाईची काठी उगारणाऱ्या केंद्रीय सरकारशी नवीन वर्षामध्ये जनतेला दोन हात करावे लागतील असे चित्र दिसते आहे”, असं ही अग्रलेखात म्हटलं आहे.

“करोना राक्षस गाडून जनतेने एक युद्ध जिंकलं, आता जनतेला नवनिर्मितीबरोबरच महागाईला गाडण्यासाठी संघर्षाचीही गुढी उभारावीच लागेल”, असं देखील त्यात नमूद करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GFA Award: गोव्याच्या फुटबॉलमधील दोन दिग्गजांचा गौरव! शिवानंद साळगावकर, मॉरिसियो आफोन्सो यांना जीवनगौरव पुरस्कार

Headland Sada Shed Case: 'मुरगावचा राजा'च्या अनधिकृत शेडवर हायकोर्टचा दणका! बुधवारपर्यंत पाडकाम करा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांवर अवमानाची कारवाई

Hospital Staff Shortage: रुग्णसंख्या चौपट वाढली, कर्मचारी मात्र जैसे थे! मडगाव जिल्हा इस्पितळावर दररोज 2 हजार रुग्णांचा भार; 193 पदे रिक्त

Goa Politics: महाआघाडीची खिचडी शिजेना; काँग्रेसच्या नेत्यांची चिंता मिटेना! विरोधकांचे दरवाजे खुले, पण हातमिळवणीला मात्र खिळे

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

SCROLL FOR NEXT