ravi Rana Dainik Gomantak
महाराष्ट्र

भाजप नाच्या पोरांसारखा नवनीत राणांच्या इशाऱ्यावर नाचतो; शिवसेनेचा बोचरा वार

शिवसेनेचा भाजपला टोला, भाजपचा ही शिवसेनेवर पलटवार

दैनिक गोमन्तक

मुंबई : महाराष्ट्रात अन्नधान्याच्या वाढत्या किंमती, भडकलेले इंधनदर, वाढलेल्या खाद्य तेलाच्या किंमती, यामूळे दिवसें -दिवस कोलमडत असलेलं सामान्य नागरिकांचे अर्थिक गणित, सामान्य नागरीकांच्या समस्यांचे उपाय शोधण्यापेक्षा लोकप्रतिनिधी एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करत आहेत. कारण चिखलफेक करणे त्यांना सर्वात महत्त्वाचं वाटतं. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपलं मुखपत्र असणाऱ्या सामनातून भाजपवर पलटवार केला आहे.(shiv sena criticize bjp)

सामनातून पलटवार करताना “संसदेत श्रीरामाच्या नावाने शपथ घेणाऱ्यांना या बाईने विरोध केला होता. त्याच बाई आज ‘हनुमान चालिसा’ वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात व समस्त भाजपा नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो हे आश्चर्यच आहे,” अशा कठोर शब्दांमध्ये नवनीत राणा प्रकरणावरुन भाजपवर शिवसेनेनं निशाणा साधला आहे.

या टीकेला कठोरपणे उत्तर देत. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेच्या टीकेवर भाष्य करताना राष्ट्रवादीचे नेते संदर्भ देत . “रोज सकाळी सकाळी राष्ट्रवादीच्या तालावर शिवसेनेचा नेता माध्यमांसमोर नाचत असतो. भाजपाच्या नावानं शिमगा करायचा हा एककलमी कार्यक्रम मालकांनी दिला असून त्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न करत असतो. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरील दगडफेकीचं समर्थन करताना जर भविष्यात खरोखरच भ्रष्टाचारी नेत्यांवर कुणी दगडफेक, चप्पला फेकल्या तरी निषेध करू नये म्हणजे झाले,” असं उपाध्ये यांनी म्हटलंय.

असे असले तरी गेले कित्येक दिवस महाराष्ट्रात सुरु असलेलं आरोप - प्रत्यारोप नाट्य संपणार का ? याकडे सामान्य नागरीकांचे लक्ष लागून राहीलेलं आहे. कारण कोणता नेता काय आरोप करतो याऐवजी माझ्या दैनंदिन समस्या संपतील का ? हे महत्त्वाचं सामान्यांना महत्त्वाचं वाटतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT