CBI office  Dainik Gomantak
महाराष्ट्र

शीना बोरा हत्या कांडाचा तपास बंद; CBI ने कोर्टात दिली माहिती

दैनिक गोमन्तक

मुंबई: केंद्रीय अन्वेषण विभागने(CBI) सनसनाटी शीना बोरा (Sheena Bora) हत्या प्रकरणाचा तपास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शीनाची आई आणि माजी मीडिया एक्झिक्युटिव्ह इंद्राणी मुखर्जी प्रकरणी खटल्यात आरोपी आहे. तपास यंत्रणेने मुंबईतील विशेष न्यायालयाला 2012 च्या हत्येसंदर्भातील तपास पूर्ण झाल्याचे सांगितले आहे. सीबीआयने या प्रकरणात तीन आरोपपत्रे आणि दोन पूरक आरोपपत्र दाखल केले आहेत. या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून इंद्राणी मुखर्जी, तिचा चालक श्यामवर राय, माजी पती संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांची नावे आहेत. इंद्राणीला 2015 मध्ये 25 वर्षीय शीना बोराच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती.

तीन महिन्यांनंतर पीटरला मुखर्जी यांना इंद्राणीला हत्या करण्यात मदत केल्याबद्दल अटकही झाली. तर एका वेगळ्या प्रकरणात, इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवरला अटक केल्यानंतर हा खून उघडकीस आला होता. श्यामवरही या प्रकरणात आरोपी होता मात्र नंतर तो सरकारी साक्षीदार बनला. शीना बोराची कथितपणे इंद्राणीने हत्या केली आणि यामध्ये तिचा कार ड्रायव्हर आणि दुसरा पती संजीव खन्ना यांनी तीला मदत केली.

तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणी शीनाच्या राहुल मुखर्जीशी (तिच्या पहिल्या लग्नापासून पीटर मुखर्जीचा मुलगा) नातेसंबंधामुळे खूप नाराज होती. इंद्राणीने मित्रांना सांगितले होते की शीना अमेरिकेत शिफ्ट झाली आहे. नंतर, ड्रायव्हरच्या जवाबानुसार, शीनाचा अर्धा जळालेला मृतदेह मुंबईजवळील जंगलातून सापडला.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, शीना बोराने आर्थिक वादानंतर आईचे पीतळ उघड करण्याची धमकी दिली होती. वर्ष 2017 पासून सुरू झालेल्या खटल्यात सुमारे 60 साक्षीदारांनी आपले जवाब नोंदवले. तुरुंगात असताना इंद्राणी आणि पीटरने त्यांचे 17 वर्षांचे नाते संपवले आणि 2019 मध्ये घटस्फोट घेतला. तर पीटर मुखर्जीची गेल्या वर्षी जामिनावर सुटका झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT