Sharad Pawar Ajit Pawar NCP News
Sharad Pawar Ajit Pawar NCP News Gomantak Digital
महाराष्ट्र

Sharad Pawar: शरद पवारांचा राजीनामा मागे, पण चर्चा अजित पवारांच्या अनुपस्थितीची

Manish Jadhav

Sharad Pawar Takes Back Resignation

तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देणार, अशी घोषणा करणाऱ्या शरद पवार यांनी शुक्रवारी निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

मात्र, या पत्रकार परिषदेत अजित पवार (Ajit Pawar) हे अनुपस्थित असल्याने चर्चेला उधाण आले आहे. मात्र, पत्रकार परिषदेत सर्व जण उपस्थित असतात का, अशी प्रतिक्रिया देत पवारांनी अजितदादांच्या अनुपस्थितीच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

मंगळवारी २ मे रोजी ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती.

पक्षातील नेत्यांची समिती नवीन अध्यक्षाबाबत निर्णय घेतील, असं पवारांनी सांगितलं होतं. मात्र, पवारांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

पवारांचा राजीनाम्याचा निर्णय आम्हाला अमान्य असून त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्ते करत होते. कार्यकर्त्यांच्या विनंतीनंतर शरद पवारांनी निर्णयाचा फेरविचार करु असं सांगितले होते.

अखेर शुक्रवारी संध्याकाळी शरद पवारांनी (Sharad Pawar) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचे सांगितले.

मी अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते.

पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपवणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल, असं पवारांनी सांगितले.

शरद पवारांनी पत्रकार परिषदेत काय म्हटलंय पाहा

Sharad Pawar

'सार्वजनिक जीवनातून निवृत्त होत नाही'

'लोक माझे सांगाती' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पवार म्हणाले होते की, 'मी अध्यक्षपदावरुन पायउतार होत असलो तरी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होत नाही. 'सतत प्रवास' हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.

सार्वजनिक कार्यक्रमात, सभांमध्ये सहभागी होत राहीन. मी पुणे, मुंबई, बारामती, दिल्ली किंवा भारताच्या इतर कोणत्याही भागात असो, मी नेहमीप्रमाणेच तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध आहे.'

अजित पवार यांची गैरहजेरी

राजीनामा मागे घेण्याच्या घोषणेदरम्यान अजित पवार यांच्याबबातही पत्रकारांकडून विचारण्यात आले.

त्यावर शरद पवार म्हणाले की, 'इतर लोक इथे आहेत. कोअर कमिटीने हा निर्णय घेतला आहे. यानंतर त्यांच्या भावनांचा आदर करत मी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला.

सर्वजण एकत्र आहेत. हा निर्णय घेणाऱ्या समितीमध्ये पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला होता.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT