Sharad Pawar  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sharad Pawar: शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन होणार पायउतार

Sharad Pawar Resigns As NCP Chief: महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. '

Manish Jadhav

Sharad Pawar Resigns As NCP Chief: महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

'लोक माझे सांगाती' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. त्यांनी पुढील निवडणूक लढवणार नसल्याची माहिती दिली.

अध्यक्षपद सोडल्याच्या वृत्ताने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. जून 1999 मध्ये काँग्रेसपासून फारकत घेऊन पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.

पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान बोलताना सांगितले की, "राज्यसभा सदस्य म्हणून माझ्याकडे संसदेत तीन वर्षे शिल्लक आहेत, त्या काळात मी महाराष्ट्र (Maharashtra) आणि देशाशी संबंधित विषयांवर लक्ष केंद्रित करेन. कोणत्याही प्रकारे जबाबदारी घेणार नाही.'

MVA च्या निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावली

चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, संरक्षण आणि केंद्रीय कृषी मंत्री म्हणून काम केलेल्या पवारांनी 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी (MVA) सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (Congress) आणि वैचारिकदृष्ट्या भिन्न असलेल्या शिवसेनेला एकत्र आणले. आता पवारांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर एमव्हीएच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

'सार्वजनिक जीवनातून निवृत्त होत नाही'

पवार पुढे आपल्या भाषणादरम्यान म्हणाले की, 'मी अध्यक्षपदावरुन पायउतार होत असलो तरी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होत नाही. 'सतत प्रवास' हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात, सभांमध्ये सहभागी होत राहीन. मी पुणे, मुंबई, बारामती, दिल्ली किंवा भारताच्या इतर कोणत्याही भागात असो, मी नेहमीप्रमाणेच तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध आहे.'

पुढील पक्षप्रमुखाचे नाव निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे

पक्षप्रमुखपदाची जबाबदारी कोणाकडे द्यायची याचा निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. पॅनेलमध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, छगन भुजबळ आदी ज्येष्ठ सदस्य असावेत, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT