Sharad Pawar & Ajit Pawar  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजितदादांना निवृत्तीचा निर्णय माहिती होता का? शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar Takes Back Resignation: मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत सुरु असलेल्या राजकीय नाट्यावरुन अखेर पडदा उठला.

Manish Jadhav

Sharad Pawar Takes Back Resignation: महाराष्ट्रात आज मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत सुरु असलेल्या राजकीय नाट्यावरुन अखेर पडदा उठला.

राष्ट्रावादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अध्यक्षपदाबाबत सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. 'लोक माझे सांगाती' या त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय पवार यांनी घेतला होता.

यातच, आता अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याचे पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी याबद्दल स्पष्टपणे सांगितले. मात्र येत्या काळात उत्तराधिकारी निवडण्यासंबंधी विचार केला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, पवार यांच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गैरहजेरीने सर्वांचे लक्ष वेधले.

अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत पत्रकारांनी अनेक प्रश्न यावेळी शरद पवार यांना विचारले. यावर पवार म्हणाले की, 'सगळे पत्रकार परिषदेला असतात का? अध्यक्षपदाच्या निर्णयाबाबत अजित पवार यांना आगोदरच सांगितले होते.'

अजित पवार यांची गैरहजेरी

राजीनामा मागे घेण्याच्या घोषणेदरम्यान अजित पवार यांच्याबबात पत्रकारांकडून विचारण्यात आले. त्यावर शरद पवार म्हणाले की, 'इतर लोक इथे आहेत. कोअर कमिटीने हा निर्णय घेतला आहे.

यानंतर त्यांच्या भावनांचा आदर करत मी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वजण एकत्र आहेत. हा निर्णय घेणाऱ्या समितीमध्ये पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला होता.'

दुसरीकडे, मंगळवारी 2 मे रोजी ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. प

क्षातील नेत्यांची समिती नवीन अध्यक्षाबाबत निर्णय घेतील, असं पवारांनी सांगितलं होतं. मात्र, पवारांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

पवारांचा राजीनाम्याचा निर्णय आम्हाला अमान्य असून त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्ते करत होते. कार्यकर्त्यांच्या विनंतीनंतर शरद पवारांनी निर्णयाचा फेरविचार करु असं सांगितले होते.

'सार्वजनिक जीवनातून निवृत्त होत नाही'

'लोक माझे सांगाती' या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात पवार म्हणाले होते की, 'मी अध्यक्षपदावरुन पायउतार होत असलो तरी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होत नाही. 'सतत प्रवास' हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.

सार्वजनिक कार्यक्रमात, सभांमध्ये सहभागी होत राहीन. मी पुणे (Pune), मुंबई, बारामती, दिल्ली किंवा भारताच्या इतर कोणत्याही भागात असो, मी नेहमीप्रमाणेच तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

Jiva Mahala History: होता 'जिवा' म्हणून वाचला 'शिवा'! जिवा महाला कसे बनले शिवाजी महाराजांचे 'अंगरक्षक'; वाचा ऐतिहासिक भेटीची कहाणी!

International Purple Festival 2025: 9 ऑक्टोबरपासून पणजीत रंगणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिव्हल, नोंदणी अनिवार्य; जाणून घ्या स्थळ, थीम आणि प्रमुख आकर्षणे

Viral Video: स्टाईल मारत रील बनवणाऱ्या कपलचा जीवावर बेतणारा थरार व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, 'लो भाई हो गया कांड'!

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT