Sharad Pawar Resigns: शरद पवारांचा मोठा निर्णय, पक्षाध्यक्षपदावरून शरद पवार निवृत्त

साहेब, निर्णय मागे घ्या : कार्यकर्त्यांचा आक्रोश
Sharad Pawar Resigns
Sharad Pawar ResignsDainik Gomantak
Published on
Updated on

Sharad Pawar केवळ राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणावर अमिट ठसा उमटविणारे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर नेते आणि कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

निमित्त होते ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाचे. पवारांच्या मनामध्ये नेमके काय चालते? हे कुणाला कळत नाही याचे प्रत्यंतर आज पुन्हा एकदा आले. पवारांनी अचानक केलेली निवृत्तीची घोषणा, कार्यकर्त्यांना रुचली नाही.

‘काहीही करा पण साहेब आम्हाला सोडून जाऊ नका,’ अशी आर्त साद कार्यकर्त्यांनी घातली. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आदींनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये अभूतपूर्व भावनाकल्लोळ निर्माण झाला.

पवार तेथून बाहेर पडल्यानंतरही अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीपुढे झोपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या कार्यकर्त्यांना हटविताना पोलिसांना कसरत करावी लागली.

आम्ही शरद पवार साहेबांसोबत बैठक घेतली आणि कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या. त्यांनी दोन-तीन दिवसांत यावर विचार करतो असे सांगितले. कार्यकर्ते उपाशी राहून आंदोलन करत आहेत हे त्यांच्या मनाला पटलेले नाही.

सगळ्या कार्यकर्त्यांनी घरी जावे असे त्यांनी सांगितले. जर कार्यकर्त्यांनी इथेच थांबण्याचा हट्ट केला तर मात्र आपण निर्णय बदलणार नाही असे पवार साहेबांनी सांगितले आहे.

- अजित पवार, विरोधी पक्ष नेते

Sharad Pawar Resigns
Mahadayi Water Dispute: भाजपनंतर काँग्रेसही म्हादईचा गळा घोटण्यास तयार
  • ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांची पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा

  • प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावूक

  • घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी खडसावले

  • कार्यकर्ते आक्रमक, घोषणाबाजी सुरूच, सभागृहात तणाव

  • धाराशिव, बुलडाण्याच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

  • राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू

  • सुप्रिया सुळे, अजित पवार यांचा माध्यमांशी संवाद

  • शरद पवार दोन ते तीन दिवसांत निर्णय घेतील : अजित पवार

  • आंदोलन मागे घेण्याचे शरद पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com