Sharad Pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

पवार-मोदी भेटीनंतरही 'राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपविरोधातचं'

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. दुसरीकडे शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. परंतु आता शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद आणखी शिगेला पोहोचला आहे. याच पाश्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Prime Minister Narendra Modi) भेट घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्रासह (Maharashtra) देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधान आले होते. दुसरीकडे, महाराष्ट्रातील राजकारणात या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले होते. त्यामुळे आता स्वत: हा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांचा खुलासा केला आहे.

शरद पवार म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर तब्बल 20-25 मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्रासह देशातील कोणत्याही राजकीय मुद्यावर चर्चा झाली नाही. महाराष्ट्रातील केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायाबाबत आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईबाबतचा मुद्दा पंतप्रधानांसमोर मी मांडला. राज्यपालांकडे प्रलंबित असणाऱ्या 12 आमदारांच्या मुद्यांवर आमच्यामध्ये चर्चा झाली आहे.'' संजय राऊतांवर कारवाई करण्याची काय गरज होती, असा सवाल उपस्थित करत शरद पवारांनी केंद्रीय तपास यंत्रणेला धारेवर धरलं.

पवार पुढे म्हणाले, ''नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. 12 आमदारांच्या मुद्यावर चर्चा करु असे मोदींनी म्हटले आहे. राष्ट्रावादी कॉंग्रेस आणि शिवसेना भाजपविरोधात सदैव उभी असणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्यांच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादी भाजपबरोबर जाणार नाही.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे स्पेशल! तुमच्या जिगरी मित्राला पाठवा 'हे' खास संदेश

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

SCROLL FOR NEXT