महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. परंतु आता शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद आणखी शिगेला पोहोचला आहे. 'कोणत्याही दबावाला बळी पडायचं नाही. मुंबईसह महाराष्ट्रात आपल्याला ठाकरे सरकारच्या विरोधात नवा संघर्ष उभा करायचा आहे,' असा निर्धार महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त (bjp foundation day) फडणवीस मुंबईतील (Mumbai) भाजप कार्यालयात बोलत होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीसांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
दरम्यान, येत्या काळात ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) विरोधात आपल्याला नवा संघर्ष उभा करायचा आहे. कोणत्याही दबावाला आपल्याला बळी पडायचं नाही. ठाकरे सरकारला सत्तेच्या सिंहासनावरुन खाली खेचल्याशिवाय आपल्याला स्वस्थ बसायचं नाही, असं फडणवीस यांनी म्हटले आहे.
तसेच, 'कार्यकर्त्यांचा हाच विश्वास स्थापना दिनाच्या निमित्ताने उत्साहित करतो,' असं म्हणत फडणवीस यांनी नव्या संघर्षाचे संकेत दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हाही बोलतात तेव्हा आपल्याला नवी प्रेरणा, नवी दिशा दाखवतात. भारतीय जनता पक्षाची निर्मिती ही राष्ट्रवादातून झाली आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीर मुद्यावरुनच पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता.
तर दुसरीकडे, ''भारतीय जनता पक्ष हा विश्वातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपला संपण्याकरिता विरोधकांना खूप प्रयत्न करावे लागतील. आणीबाणीच्या काळात अनेक नेत्यांना 2-2 वर्ष जेलमध्ये डांबलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 2 जेलमध्ये होतो तेव्हा डगमगलो नाही,'' असेही फडणवीस म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.