बेळगावातील पत्रकार आणि नेत्यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे अश्वासन, Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत दिवाळीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार

बेळगावातील पत्रकार आणि नेत्यांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे अश्वासन, पूर्वी काढलेला तोडगा पुन्हा मंजूर करुन घेण्यासारखी सध्याची परिस्थिती नाही.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra-Karnataka) यांच्यातील बेळगावचा (Belgaum) सीमाप्रश्नाबाबत दिवाळीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी चर्चा करणार असल्याचे अश्वासन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले आहे. बेळगावातील पत्रकार आणि माजी जिल्हा सरपंच सदस्या सरस्वती पाटील यांनी बारामतीत भेट घेतली त्यावेळी पवार यांनी त्यांच्याशी बोलताना सांगितले.

केंद्रातील भाजपचे सरकार महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी भूमिका घेत नाही. त्यामुळे सीमावासीयांच्या लढ्याला आम्ही आणखीन गतिशील बनवून त्यांचे प्रश्न मार्गीलावण्याचा प्रयत्न करु असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. 1993 मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना याबाबत तोडगा मांडला होता. परंतू त्यात बेळगावच्याच लोकांनी आडकाठी केली. पण आता तोच पुन्हा मंजूर करुन घेण्यासारखी सध्याची परिस्थिती नाही. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादीचे सरकार असले तरी कर्नाटकात मात्र भाजपची सत्ता आहे. त्यामुळे केंद्राचा पाठिंबा त्यांनाच असणार परंतु याबाबत आपण मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार आहे. याबाबत गांभीर्याने चर्चाकरुन काय तोडगा काढता येईल यावर विचार करु. अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

खानापूर तालुका, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आणि माजी आमदार दिगंबर पाटील यांनी 1993 मध्ये काढलेल्या तोडग्याचा उल्लेख केल्याने सीमाभागात आता चर्चेला उधाण आले. यावर कोल्हापूर येथे मोठे आंदोलन देखील उभारण्यात आले, त्यामुळे आता शरद पवार यांनी त्यावेळी मांडलेल्या तोडग्याबाबत काय करता येईल का? याचा आढावा घेण्यासाठी बेळगावातील पत्रकार आणि नेते बारामतीत शरद पवार यांना भेटण्यास गेले होतो. पण त्यावेळी जी परिस्थिती होती ती सध्या नसल्याने तो पर्याय अवघड दिसत आहे. त्यावेळी आम्ही सत्तेत असल्याने कर्नाटकातील वातावरण याबाबत पोषक होते. पण आता कर्नाटकात भाजप सरकारच असल्याने याबाबत कोणतीही सहानुभूती मिळेल असे दिसत नाही. तरी देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलून पुढील निर्णय घेऊ. असेही पवार यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT