Sharad Pawar Dainik Gomantak
महाराष्ट्र

'भूमिका साकारल्यामुळे त्यांचे विचार तसे असतीलच असे नाही': शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा अमोल कोल्हेंच्या भूमिकेला विरोध तर शरद पवारांनी केली पाठराखन.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे ''Why I Killed Gandhi'' या चित्रपटात नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ३० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीअमोल कोल्हेंच्या या भूमिकेला विरोध केला आहे. तर काहींनी मात्र कलाकार म्हणून त्यांनी केलेल्या भूमिकेची पाठराखण केली आहे.

दरम्यान या सर्व वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात त्यांनी खासदार अमोल कोल्हेंची पाठराखन केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, अमोल कोल्हे हे एक कलाकार आहेत, त्यामूळे कलाकार म्हणून त्यांनी नथुराम गोडसेची (Nathuram Godse)भूमिका केली असल्याचं सांगितलं आहे.

सिनेमामध्ये कलाकार एखादी भूमिका घेत असेल तर त्याकडे आपण कलाकार म्हणून बघितले पाहिजे. गांधींवर सिनेमा प्रसिद्ध झाला आणि त्या माध्यमातून गांधीजींचं महत्व सर्व जगाला कळलं. त्यात ज्याने गांधी (Mahatma Gandhi)आणि नथुराम गोडसेची भूमिका साकारली ते कलाकार होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटामध्ये अफजलखानाची भूमिका कोणी साकारली तर तो मुघल साम्रज्याचा पुरस्कर्ता होत नाही तर तो कलाकार म्हणून ती भूमिका साकारत असतो. भूमिका साकारल्यामुळे त्यांचे विचार तसे असतीलच असे नाही, असे ही शरद पवार म्हणाले.

अमोल कोल्हेंनी केलेली भूमिका ही कलाकार म्हणून केली. ज्यावेळी त्यांनी ही भूमिका साकारली त्यावेळी ते आमच्या संपर्का नव्हते. त्यांनी भूमिका केली याचा अर्थ गांधीजींच्या हत्येचं समर्थन करणार आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. एक कलाकार म्हणून अमोल कोल्हेंना समर्थन आहे, असंही पवार म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT