पुणे : 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटावरून सध्या देशात भाजप विरूद्ध इतर पक्ष असा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. तर काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री चर्चेत आहेत. त्यांच्यावरही टीका होताना दिसत असून ते प्रत्येक टीकेला उत्तर देताना दिसत आहेत. या चित्रपटावरून विरोधक आक्रमक झाले असून चित्रपटासह भाजप नेत्यांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी टीका केल्यानंतर त्यावर बराच वादंग झाला होता. त्यानंतर आला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार) यांनीही द काश्मिर फाईल्स चित्रपटावरुन भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधताना, 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटामुळे मनं जोडण्याऐवजी मनं तोडण्याचं काम झाल्याचे म्हटले आहे.
तसेच देशात विद्वेषाचं राजकारण सुरु असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटीलही उपस्थित होते. (Sharad Pawar criticizes BJP and PM Modi over The Kashmir Files movie )
यावेळी पवार म्हणाले की, टीका करण्याचा अधिकार विरोधकांना आहे. मात्र, ती विद्वेष नसायला हवी. पण सध्या विद्वेष टीकाच होताना पहायला मिळत आहे. तसेच देशाचे राजकारण ही चुकीच्या दिशेला जात आहे. 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट आला आणि अनेकांना लक्ष केले जात आहे. काँग्रेसवर (Congress) टीका होत आहे.
या चित्रपटामुळे मनं जोडण्याऐवजी मनं तोडण्याचेच काम होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Director Vivek Agnihotri) आणि टीम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) भेटीला गेली होती. त्यावेळी मोदींनी चित्रपटाचं कौतुक करताना, हा चित्रपट चांगला आहे. सर्वांनी तो पाहावा. तर असे चित्रपट आणखी बनवले गेले पाहिजेत. जेणे करून लोकांना सत्य कळेल असे म्हटले होते.
दरम्यान, लोकांनी विसरू नये काश्मिरमधून काश्मिरी पंडित बाहेर पडले तेव्हा सत्तेत काँग्रेस नव्हती. तर व्ही. पी. सिंग यांचं सरकार होतं. त्यावेळी भाजपचा त्यांना पाठिंबा होता. त्यामुळे काँग्रेसच्या नाही तर भाजपच्या (BJP) काळात काश्मिरी पंडित बाहेर गेले. देशाला नवी दिशा देण्याचे काम गांधी, नेहरुंनी केल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.