केजरीवालांच्या 'काश्मीर फाईल्स'वरील विधानावर दिग्दर्शकाची तिखट प्रतिक्रिया

दिल्लीत 'द काश्मीर फाइल्स' करमुक्त करण्यापेक्षा चित्रपट यूट्यूबवर अपलोड करावा: केजरीवाल
Vivek Agnihotri
Vivek Agnihotri Dainik Gomantak
Published on
Updated on

काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री चर्चेत आहेत. अलीकडेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'द काश्मीर फाइल्स' करमुक्त करण्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते.

Vivek Agnihotri
शहनाज गिल आणि शिल्पा शेट्टीचा भन्नाट डान्स होतोय व्हायरल

केजरीवाल म्हणाले होते, "दिल्लीत 'द काश्मीर फाइल्स' करमुक्त करण्यापेक्षा चित्रपट यूट्यूबवर अपलोड करावा. असे केल्याने प्रत्येकजण या चित्रपटाचा विनामूल्य आनंद घेऊ शकेल." मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, 'द कश्मीर फाइल्स' चे दिग्दर्शकांनी नुकतेच माखनलाल चतुर्वेदी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जर्नलिझम अँड कम्युनिकेशन, भोपाळ येथे चित्र भारती फिल्म फेस्टिव्हलला भेट दिली. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषदेत (Press Conference) माध्यमांशी संवाद साधला. केजरीवाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता अग्निहोत्री यांनी उत्तर दिले, “अनेक लोकांना तर देव पृथ्वीवर यावा असे वाटते.” ते पुढे म्हणाले, “मूर्ख आणि वेड्या लोकांपासून वाचून राहिले पाहिजे, त्यांना उत्तर द्यायचे नसते."

Vivek Agnihotri
जॉन अब्राहमला तेव्हा तालिबानकडून मिळाल्या होत्या धमक्या

याआधी या चित्रपटात (Movie) मुख्य भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी ट्विट करून लिहिले, मित्रांनो, आता सिनेमागृहात जाऊन 'द काश्मीर फाइल्स' बघा. तुम्हाला 32 वर्षांनंतर काश्मिरी हिंदूंचे दुःख कळले आहे. त्यांच्यावर झालेले अत्याचार समजून घ्या. त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवा. पण जे त्याची चेष्टा करत आहेत, कृपया त्यांना तुमची शक्ती दाखवून द्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com