NCP leaders meeting Dainik Gomantak
महाराष्ट्र

शरद पवारांनी बोलावली NCPची बैठक

आज सायंकाळी 5 वाजता मुंबईत ही बैठक पार पडणार आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात ही बैठक पार पडेल.

दैनिक गोमन्तक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी आपल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली. आज सायंकाळी 5 वाजता मुंबईत ही बैठक पार पडणार आहे. यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) सभागृहात ही बैठक पार पडेल. या बैठकीला शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित असणार आहे. (NCP leaders meeting)

बैठकीत कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बोलावलेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवरती चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून (BJP) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारवर करण्यात येत असलेले आरोप, नवाब मलिकांना झालेली अटक आणि त्यानंतर भाजपकडून मलिकांच्या राजीनाम्यासाठी होत असलेली जोरदार मागणी या मुद्द्यांवरती चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

यासोबतच नुकत्याच देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2022) चार राज्यांत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. या विजयांमुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा आत्मविश्वासही वाढला. भाजपकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती होणारे आरोप, गुन्हे दाखल, ईडी, आयकर विभागाची धाड या वरुन राज्याचं वातावरण ढवळून निघाले आहे. या सर्व मुद्द्यांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electricity Conservation: विजेची बचत करा! शासकीय कार्यालयांना सावंत सरकारचा आदेश; नियमांचे पालन न केल्यास...

Cash For Job Scam: मंत्र्यांच्‍या कार्यालयांशी जवळीक, म्हणून अनेकजण भुलले 'श्रुतीला'; कष्टाची कमाई गमावली !

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

SCROLL FOR NEXT