आदित्य ठाकरेंच्या मतदार संघात अमित ठाकरेंची उपस्थिती

होळी सणाच्या निमितत्ताने मनसे नेते अमित ठाकरे वरळी कोळीवाड्यात उपस्थित राहतील, तर विशेष म्हणजे वरळी हा शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे.
Aditya Thackeray And Amit Thackeray
Aditya Thackeray And Amit ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

होळी (Holi) सणाच्या निमितत्ताने मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) वरळी (worli) कोळीवाड्यात उपस्थित राहतील, तर विशेष म्हणजे वरळी हा शिवसेना नेते (Shiv Sena) आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा मतदारसंघ आहे. होळी सणाच्या निमित्ताने दरवर्षी वरळी कोळीवाड्यात कार्यक्रमाचं आयोजन उत्साहात करण्यात येतं. यावर्षीच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे हे त्या भागातील लोकप्रतिनिधी असल्यामुळे कदाचित ते यावेळी उपस्थित राहू शकतात. तर मनसे नेते अमित ठाकरे हे देखील होळीच्या कार्यक्रमानिमितत्ताने वरळी कोळीवाड्यात उपस्थिती लावणार आहेत. (Amit Thackeray's presence in Aditya Thackeray's constituency)

Aditya Thackeray And Amit Thackeray
'ज्या' शाळेत पेपर फुटेल 'त्या' शाळेची मान्यताच रद्द; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी नाहीये. याउलट चीनमध्ये कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने (State Government) होळीच्या पार्श्वभूमीवर आणि दहावी-बारावीच्या परीक्षेमुळे नियमावली जारी केली. तर मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांना पोलिसांनी नोटीस बजावली.

होळीसाठी नियमावली देखील जाहीर केली

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे आणि त्यामुळे निर्बंधही कमी होताना दिसत आहे. निर्बंध कमी झाल्याने नागरिक आता मोठ्या उत्साहात होळी, धुळवड (Dhulivandan) साजरी करण्याचा बेत आखत आहे. कारण, होळी आणि धुळवड साजरी करण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली. राज्याच्या गृह खात्याकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली असून त्या संदर्भातील नियमांचे पालन नागरिकांना करावेच लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com