Nagnath Kottapalle Dainik Gomantak
महाराष्ट्र

Nagnath Kottapalle Death: ज्येष्ठ लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन

Nagnath Kottapalle Death News: ज्येष्ठ लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दैनिक गोमन्तक

Nagnath Kottapalle Death News: ज्येष्ठ लेखक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोत्तापल्ले 74 वर्षांचे होते. कथा, कादंबरी आणि समीक्षा अशा विविध अंगानी नागनाथ कोत्तापल्ले यांनी मराठीत लेखन केलं आहे.

दरम्यान, चिपळूण येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्याचबरोबर त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून देखील अनेक वर्षे काम केलं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते फुफ्फुसाच्या कर्करोगाशी झुंजत होते. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर त्यांचं निधन झालं.

तसेच, नांदेड जिल्ह्यातील मुखेडमध्ये डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म झाला होता. त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी देगलूर येथील महाविद्यालयातून (Colleges) पदवी घेतली. नंतर एम. ए. त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून पूर्ण केले. विशेष म्हणजे, पीएचडी त्यांनी शंकर पाटील यांच्या साहित्यावर केली होती.

नागनाथ कोत्तापल्ले यांचा कथासंग्रह:

  • कर्फ्यू आणि इतर कथा

  • संदर्भ

  • राजधानी

  • रक्त आणि पाऊस

  • कवीची गोष्ट

  • देवाचे डोळे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT