Mumbai Police 

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

मुंबईत कलम 144 लागू; मुंबई पोलिसांचा आदेश

पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच शहरातील दुकानात आणि सर्व सार्वजनिक वाहतुकीत प्रवेश मिळेल.

दैनिक गोमन्तक

मुंबई: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बुधवारी देलेल्या माहितीनुसार, शहरात 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीसाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

देशाच्या अनेक भागात ओमिक्रॉनचे (Omicron variant) रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात 32 ओमिक्रॉन बाधित सापडले आहेत. पोलीस उपायुक्त आणि बृहन्मुंबईचे कार्यकारी दंडाधिकारी चैतन्य एस यांनी जारी केलेली अधिसूचना मुंबईत (Mumbai) 31 डिसेंबरपर्यंत लागू राहील. पोलिसांच्या आदेशात म्हटले आहे की, कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराने सतत उद्भवलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध लावण्यात आले आहेत.

अधिसूचने नुसार, पूर्णपणे लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच शहरातील दुकानात आणि सर्व सार्वजनिक वाहतुकीत प्रवेश मिळेल. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाला आसन क्षमतेच्या 50 टक्केच जागा भरण्याची परवानगी आहे. तसेस उपस्थित लोकांचे लसीचे दोन्ही डोस घेतले असणे बंधनकारक आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) प्रवेश करणार्‍या व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे किंवा प्रवेशाच्या 72 तासांच्या आत केलेल्या कोरोना चाचणीचा निकाल नकारात्मक असणे आवश्यक आहे. उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि इतर संबंधित दंडात्मक तरतुदींनुसार शिक्षा केली जाईल, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: गोवा नाईटक्लब आग प्रकरण; बर्च बाय रोमिओ लेनच्या सहमालकाची जामिनासाठी कोर्टात धाव

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

SCROLL FOR NEXT