Sanjay Raut: Shivsena will contest Goa & Uttar Pradesh assembly election Dainik Gomantak
महाराष्ट्र

गोव्यासह उत्तर प्रदेशच्या रणांगणातही शिवसेना लढणार,संजय राऊत यांनी केले स्पष्ट

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज त्यांचा पक्ष उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोव्यामध्ये (Goa) पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका (Assembly Election 2022)लढवेल असे स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमन्तक

शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज त्यांचा पक्ष उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोव्यामध्ये (Goa) पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका (Assembly Election 2022)लढवेल असे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी संघटना त्यांच्या पक्षाला पाठिंबा देण्यास तयार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना उत्तर प्रदेशातील 403 पैकी 100 जागांवर आपले उमेदवार उभे करेल (Uttar Pradesh Assembly Election), तर सेना गोवा विधानसभेच्या 40 पैकी 20 जागांवर निवडणूक लढवेल. रा पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी संघटनांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, आम्ही लहान पक्षांसोबत युती करू शकतो.(Sanjay Raut: Shivsena will contest Goa & Uttar Pradesh assembly election)

गोव्यात महाविकास आघाडी सारखी सूत्रे शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. राऊत म्हणाले की, या दोन्ही राज्यांमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आणि ते यश किंवा अपयशाची पर्वा न करता निवडणूक लढवत आहेत. विजय रूपाणी यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ही भाजपची अंतर्गत बाब आहे, बाहेरील व्यक्तींनी टिप्पणी करण्याची गरज नाही. रुपाणी हे माझ्याबरोबर राज्यसभेचे सदस्य असल्यापासून मी त्यांना ओळखतो.

उल्लेखनीय म्हणजे, 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या वाटणीच्या मुद्यावरून शिवसेनेने दीर्घकाळ सहयोगी असलेल्या भाजपशी संबंध तोडले आणि राज्यात महा विकास आघाडी (MVA) सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती केली होती. त्यांनी दावा केला की गेल्या वेळी 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत भाजप बहुमताचा आकडा पार करण्यात यशस्वी झाला होता. यावेळी परिस्थिती पक्षासाठी चांगली नाही.

त्याचबरोबर ठाकरे यांच्यात राष्ट्रीय नेते होण्याची क्षमता असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे राष्ट्रीय नेते आहेत.असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे त्यांनी शिवसेनेच्या आगामी रणनीतीवर भाष्य केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT