Sanjay Raut Threat Message Dainik Gomantak
महाराष्ट्र

Sanjay Raut Threat Message: संजय राऊतांना लॅारेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी

लॉरेन्स बिष्णोई गँगने संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Sanjay Raut Threat Message: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याचा मॅसेज आला आहे.

यासंदर्भात संजय राऊतांनी मुंबई पोलिसांना (Mumbai) माहिती दिली आहे. शुक्रवारी (31 मार्च 2023) संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास हा मॅसेज आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.

लॉरेन्स बिश्नोई याच्या नावाने 'मी तुझे मुसेवाला सारखे हाल करेन', 'जर तू दिल्लीत सापडलास तर तुला AK 47 ने उडवून देईन, सिद्धू मूसवाला मर्डर केस सारखे तुझे पण होइल' सलमान आणि तु फिक्स आहे' ही धमकी देण्यात आली आहे.

  • यावर संजय राऊत काय म्हणाले
    या धमकीवर पुढे राऊत म्हणाले की ही काही पहिलीच वेळ नाही, हे सरकार सत्तेवर आल्यानंतर आमची सुरक्षा हटवण्यात आली, या प्रकरणी मी कोणालाही पत्र लिहिलेले नाही. एका मुख्यमंत्र्यांच्या मुलाने माझ्यावर हल्ल्याचा कट रचला, सत्य काय आहे ते आम्हाला माहीत आहे. मला कालही धमक्या आल्या होत्या, मी याबाबत पोलिसांना कळवले आहे. गृहमंत्र्यांनी काय केले ते सांगा.

  • सलमानला धमक्याही आल्या होत्या

याआधी बॉलिवुड स्टार सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले होते की, 18 मार्च रोजी सलमान खानला पाठवलेला धमकीचा ईमेल परदेशात लपून बसलेल्या गोल्डी ब्रारने पाठवला होता. 

यापूर्वी एका मुलाखतीत तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला मारणे हेच त्याच्या आयुष्याचे ध्येय असल्याचे म्हटले होते. 

  • आणखी काय म्हणाले लॉरेन्स विश्नोई?

या मुलाखतीनंतर त्याला कारागृहातून एवढ्या सुविधा कशा मिळतात, असा प्रश्नही पोलीस प्रशासनावर उपस्थित करण्यात आला. सलमान खानला माफी मागावी लागेल, असे गँगस्टरने मुलाखतीत म्हटले होते. 

सलमानने आमच्या बिकानेरच्या मंदिरात जाऊन माफी मागावी. सध्या मी गुंड नाही, पण सलमान खानला मारून गुंडा बनेन. सलमान खानला मारणे हे माझ्या आयुष्याचे ध्येय आहे. 

सुरक्षा हटवली तर मी सलमान खानला मारेन. सलमान खानला चार-पाच वर्षांपासून मारायचे होते, असेही त्याने सांगितले होते. मुसेवालाच्या हत्येवर ते म्हणाले होते की, गोल्डीने जे केले ते केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पठ्ठ्यानं ट्रेनलाच बांधली स्टीलची पेटी, सोशल मीडियावर जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा लोकांमुळेच बिहार बदनाम होतोय'

Ind vs Aus 2nd ODI: सचिन-विराटलाही जमला नाही 'तो' कारनामा केला, चौकार मारुन रचला इतिहास; कांगारुंच्या भूमीवर हिटमॅनचा रेकॉर्डब्रेक फॉर्म VIDEO

Yagneshwar Nigalye Passed Away: विनोदी, मिश्किल आणि कोटीबाज वाणी, दाभोळकरांच्या 'अंनिस'चा गोव्यात पाया रचणारे यज्ञेश्‍वर निगळ्ये वयाच्या 90 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड!

Goa Editorial: आता हद्द झाली...! संपादकीय

Goa Rain: पावसाचा धुमाकूळ कायम! पुढील चार दिवस गडगडाटासह वादळी वाऱ्याचा इशारा

SCROLL FOR NEXT