Banda Check Post : गोवा बनावटीच्या दारू वाहतूकीस बसणार चाप; उद्यापासून सुरू होणार बांदा सीमा तपासणी नाका

सिंधुदुर्गात जाणाऱ्या प्रत्येक वाहनाचे होणार स्कॅनिंग
Banda Check Post
Banda Check PostDainik Gomantak

Banda Check Post : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा बांदा-सटमटवाडी येथील गेली 15 वर्षे वादाच्या भोवऱ्यात असलेला अत्याधुनिक सीमा तपासणी नाका शनिवार (ता.1) पासून होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी आज ‘गोमन्तक’ला दिली.

यामुळे गोव्यातून महाराष्ट्रात अर्थात सिंधुदुर्गात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाचे डिजिटल स्कॅनिंग होणार आहे. त्याने गोव्यातून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीसह अवैध धंद्यांना चाप बसणार आहे.

Banda Check Post
Vehicle Sticker : पर्यटकांची सतावणूक रोखण्यासाठी ‘स्टिकर’

अनेक वर्षे विविध कारणांनी नाका वादात होता. यंदाच्या गणेश चतुर्थीला नाका सुरू करण्याच्या हालचाली होत्या. मात्र, त्यानंतर दिवाळीचा मुहूर्त ठरला. सर्व कामे जलदगतीने पूर्ण केली.

नाक्यावर प्रशासकीय तांत्रिक बाबींसह प्रवाशांसाठी सुविधा आहेत. राज्य सीमा सुरक्षिततेसाठी शासनाने अत्याधुनिक 22 तपासणी नाके उभारण्याचा निर्णय घेतला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com