Sanjay Raut  Dainik Gomantak
महाराष्ट्र

'महाराष्ट्रात आयकर विभागाची भानामती सुरु झालीयं'

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर निशाणा साधला.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. यातच महाविकास आघाडीमधील मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडी कोठडीत रवानगी झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच गढूळ बनलं आहे. राजकीय पुढारी एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. या पाश्वभूमीवर शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.(Sanjay Raut has criticized the central system)

दुसरीकडे, राऊत पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजताच महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना टार्गेट करण्यासाठी आयकर विभागाकडून धाड सत्र सुरु झाले आहे. संजय राऊत पत्रकार परिषदेत कोणता मोठा खुलासा करणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मागील काही दिवसांपासून संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये राजकीय घमासाना अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकीय आरोपांची धार अधिक गडद बनली आहे.

संजय राऊत म्हणाले, ''आज मुंबईमध्ये आयकर विभागाकडून धाड सत्र झाले आहे. आम्ही पण एक धाड टाकत आहोत. आयकर विभागाकडून धाडीची भानामती सुरु झाली आहे. जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेची निवडणुक होत नाही तोपर्यंत आयकर विभागाकडून धाडी पडतील. आज देशात केवळ महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्येच केंद्रीय यंत्रणांकडून धाडी टाकल्या जात आहे. शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर मोदी सरकाकडून केला जात आहे. किरीट सोमय्या यांनी 75 कंपन्यांची बोगस लिस्ट दिली आहे. राज्यातील सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारकडून सुडबुध्दीचं राजकारण केलं जात आहे. देशात सर्वात जास्त ईडीच्या धाडी या महाराष्ट्रात पडल्या आहेत. ईडी आणि ईडीचे काही अधिकारी केंद्र सरकारची एटीएम मशीन बनले आहेत. मोदी सरकारचे स्वच्छ भारत मिशन केवळ कचरा साफ करणे नाही, तर भ्रष्टाचाराचा कचरा साफ करणे हा आहे.''

ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील 14 प्रमुख नेत्यांवर आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. किरीट सोमय्या आणि जितेंद्र नवलानीचा काय संबंध आहे, याचा सोमय्यांनी खुलासा करावा. आम्ही चार ईडी अधिकाऱ्यांसह जिंतेंद्र नवलानीच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे लवकरच ईडीचे अधिकारी गजाआड जाऊ शकतात. किरीट सोमय्या ईडीचे वसुली एजंट आहेत. विशेष म्हणजे ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT