'ठाकरे सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं'

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर शेतकऱ्यांची मुस्कटदाबी केल्याचा आरोप केला आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत आहे. यातच महाविकास आघाडीमधील मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडी कोठडीत रवानगी झाल्यानंतर राज्यातील राजकीय जास्तच गढूळ झाले. राजकीय पुढारी एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. (Devendra Fadnavis criticized the Uddhav Thackeray government)

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरु झाले आहे. त्यामुळे विरोधक ठाकरे सरकारला विविध मुद्यावर घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानसभेत विरोधक सरकारवर टिका करताना अधिक आक्रमक दिसले. याच पाश्वभूमीवर आज विधासभा अध्यक्षांनी विधानसभेचं अधिवेशन तहकूब केले. वीज बिलाच्या मुद्दयावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर शेतकऱ्यांची मुस्कटदाबी केल्याचा आरोप केला आहे.

Devendra Fadnavis
'ठाकरे सरकार पडणार नाही', राज ठाकरेंना विश्वास

ते पुढे म्हणाले, ''महाराष्ट्रातील ठाकरे सरकार असंवेदनशील बनले आहे. हे सरकार शेतकऱ्यांना वीज बील माफ करण्यात अपयशी ठरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज बील माफ करण्याचं आश्वासन दिले होतं. मात्र ते आता या आश्वासनापासून मागे फेरले आहेत. आज सरकारने सभागृहातून पळ काढला. माझं महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की, कोणीही आत्महत्यासारेख पाऊल उचलू नका. सरकारनेच सुरज जाधव या 23 वर्षीय शेतकऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com