Sanjay Raut Twitter/ ANI
महाराष्ट्र

संजय राऊतांना झटका, Court ने सुनावली 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

Sanjay Raut: शिवसेना खासदार संजय राऊत यांना सोमवारीही कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Politics: शिवसेना खासदार संजय राऊत यांना सोमवारीही कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 22 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. विशेष म्हणजे, पत्रा चाळ प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासाला सामोरे जात असलेल्या राऊतांना रविवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना तिसऱ्यांदा कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, गुरुवारी न्यायालयाने (Court) राऊत यांच्या कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ केली. त्याचवेळी, एजन्सीने तपासात बऱ्यापैकी प्रगती केल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणी ईडी राऊतांची चौकशी करत आहे. शनिवारी त्यांची पत्नी वर्षा याही चौकशीसाठी तपास यंत्रणेसमोर हजर झाल्या होत्या. शनिवारी ईडीने त्यांची सुमारे 9 तास चौकशी केली.

दुसरीकडे, ईडीकडून (ED) सांगण्यात आले की, 'तपासादरम्यान सापडलेल्या कागदपत्रांवरुन राऊत यांनी अलिबागमध्ये खरेदी केलेल्या मालमत्तेमध्येही मोठ्या प्रमाणात रोखीचे व्यवहार होते.' राऊत यांच्या पत्नीच्या बँक खात्यात 1.08 कोटी रुपये असल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे. राऊत यांना गेल्या रविवारी अटक करण्यात आली. त्यादरम्यान त्यांच्या घरातून 10 लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला होता. मात्र, हे पैसे पक्षाचेच असल्याचे त्यांच्या भावाचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT