Sanjay Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

'मुंबईचा दादा फक्त शिवसेनाचं' !

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना पत्र लिहिल्याने खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमन्तक

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांची ईडीकडून चौकशी सुरु असताना आणि किरीट सोमय्या यांच्यासह भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना पत्र लिहिल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदही घेतली. त्यांनी ईडी आणि भाजपवर (BJP) आरोपांच्या फैरी झाडल्या. महाराष्ट्रातील (Maharashtra) ठाकरे सरकार पाडण्यासाठी काही लोकांनी मदत मागितल्याचा दावा यावेळी राऊतांनी केला. त्यांचा वापर मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी त्यांना करायचा होता. मात्र त्यांनी नकार दिल्याने माजी रेल्वेमंत्र्यांप्रमाणे तुरुंगात टाकू, अशी धमकी देण्यात आली. त्यापुढे जात लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) बनवण्याची धमकीही दिली. संजय राऊत यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (Sanjay Raut Criticized BJP)

दरम्यान, उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राचा ट्रेलर नाही, असंही संजय राऊत यांनी पीसीमध्ये म्हटले. ट्रेलर येणं अजून बाकी असून पिक्चर यायचा आहे. एका महिन्यापूर्वी सरकार पाडण्यासाठी सहकार्य करण्यास सांगितले होते, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. मात्र त्यास नकार दिल्यानंतर त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी देण्यात आल्याचे देखील संजय राऊत म्हणाले. तसेच त्यांना अनेक वर्षे तुरुंगात सडावे लागणार असल्याचेही सांगण्यात आले. माजी केंद्रीय मंत्र्यासारखी अवस्था केली जाईल, असही त्यांनी म्हटले असल्याचे राऊतांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, 'फक्त मलाच नाही तर मंत्रिमंडळातील दोन ज्येष्ठ मंत्री आणि दोन ज्येष्ठ नेत्यांनाही पीएमएलए कायद्यांतर्गत तुरुंगात टाकले जाईल. त्यामुळे महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील आणि सर्व बडे नेते तुरुंगात असलेल्या अनिल देशमुखांचे शेजारी असतील, अशा धमक्या मला देण्यात आल्या.'

राऊत यांनी आपल्या पीसीमध्ये ईडी आणि भाजपचा पर्दाफाश करण्याची घोषणा केली

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ईडी अधिकारी आणि भाजपचा खरा चेहरा उघड करण्याची घोषणा केली. त्याचबरोबर आता आपण गोव्याला जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तेथून नंतर आपण मुंबई येणार आहे. त्यानंतर ते ईडी कार्यालयाबाहेर हजारोंच्या जमावासोबत पत्रकार परिषद घेऊन सत्य उघड करतील. संजय राऊत पुढे म्हणाले की, 'केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाविकास आघाडीच्या नेत्यांना ब्लॅकमेल केले जात आहे. भाजप नेत्यांच्या नावावर मोठे घोटाळे आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. केंद्रातील भाजप सरकारमुळे देशात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.'

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे

1) संजय राऊत यांनी आपल्या PC मध्ये म्हटले की, केंद्रीय तपास यंत्रणा गुन्हेगारी सिंडिकेट चालवत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा गुंडांची टोळीच राहिली आहे. डेकोरेटरला विचारण्यात आले की, तुम्हाला किती पैसे मिळाले. मात्र मी पैसे घेतले नसल्याचे डेकोरेटरने सांगितले. त्या कुटुंबाशी माझे जुने नातेसंबंध आहेत.

२) महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना घोटाळ्यात अडकवण्यासाठी ईडीचे अधिकारी कंत्राटदारांना आमची नावे घेण्याची धमकी देत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. केंद्र सरकारची जबरदस्ती आणि ईडीच्या धमकीला मी घाबरत नाही. पत्र लिहिल्यानंतर मला देशभरातून फोन आले.

3) भाजपचे काही नेते ईडी कार्यालयात जाऊन बसतात. ते दोन-तीन लोक आहेत जे ईडीच्या अधिकाऱ्यांना कधी कोणावर कारवाई करायची, कोणाला त्रास द्यायचा हे सांगतात. त्यांची नावं मी लवकरच सांगेन.

4) महाराष्ट्रात ईडीचे सर्वाधिक गुन्हे आहेत. यूपीमध्ये नाही, बिहारमध्ये नाही. जोपर्यंत तुम्ही कायदेशीर कारवाई करत आहात तोपर्यंत आमची हरकत नाही. पण दादागिरी, ब्लॅकमेलिंग केलं तर आम्ही घाबरुन जाणार नाही.

5)मुंबईचा दादा दुसरा कोणी नाही, मुंबईचा दादा शिवसेना आहे. पुढील पत्रकार परिषद मुंबईत ईडीच्या कार्यालयाबाहेर हजारोंच्या जनसमुदायासह आयोजित करीन आणि तिथे काय चालले आहे ते वास्तव सांगेन.

6)सरकार पाडण्यास सहकार्य करण्यास नकार दिल्याने मला तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. तुमची इच्छा असेल की मी तुरुंगात जावे, मी तुरुंगात जाईन, पण तुम्हाला त्याच तुरुंगात खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुमचे पाप खूप आहे. आम्ही स्वच्छ आहोत. तुमच्या भीतीने आम्ही शांत बसणार नाही.

7) तुम्ही आणीबाणीबद्दल बोलत होता (मंगळवारच्या पीएम मोदींच्या राज्यसभेतील भाषणाचा संदर्भ देत). आज कोणते घटनात्मक कार्य केले जात आहे? ठाकरे सरकारला बदनाम करत आहेत, आमची बदनामी करत आहेत, काल मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला. महाराष्ट्र गप्प बसेल असे वाटते का? केंद्रीय एजन्सी सत्तेत आणतील असे तुम्हाला वाटते?

8) ईडी महाराष्ट्रातील नेत्यांना गोवण्याचा आणि तुरुंगात टाकण्याच्या प्रयत्नात आहे. आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करु.

9) ईडी भाजपचे रिकव्हरी एजंट आणि एजंट म्हणून काम करत आहे. वसुलीचे काम अधिकारी करतात.

10) त्यांच्या घरात घुसलो तर त्यांना नागपूरला जाण्यासाठी रस्ताही मिळणार नाही. मी जे बोलतोय ते त्यांना नीट कळले आहे (देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवत). बाहेरचे अधिकारी महाराष्ट्र आणि मुंबईतील निरपराध नागरिकांना धमकावत आहेत. मुंबई पोलिसांनी ईडीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT