Sanjay Bhosale Twitter/ @ANI
महाराष्ट्र

Maharashtra Crisis: 'शिंदे साहेब घरी परत या', शिवसैनिकाची आर्त हाक

बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले आसाममधील गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत.

दैनिक गोमन्तक

Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले आसाममधील गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी पक्षाचे आमदार एकनाथ शिंदे यांना 'मातोश्री'वर परतण्याचे आवाहन केले आहे. यावेळी पोलिसांनी त्यांना गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर अडवले. संजय भोसले यांच्याशी सहमती न झाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. (sanjay bhosale deputy district chief of shiv sena arrives in guwahati urges party mla eknath shinde to return)

एकनाथ शिंदे यांना परतण्याचे आवाहन केले

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील शिवसेना (Shiv Sena) नेते संजय भोसले हातात पोस्टर घेऊन रेडिसन ब्लू हॉटेलबाहेर पोहोचले होते. या पोस्टरवर मराठीत लिहिले होते, 'शिवसेना झिंदाबाद, एकनाथ शिंदे भाई मातोश्रीवर परत या. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना भेटा.' ते पुढे म्हणाले की, 'शिवसेनेने आपल्या आमदारांना खूप काही दिले आहे. त्यांनी 'मातोश्री'वर परतावे.'

बंडखोर आमदार गुवाहाटीतील हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत

महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सुमारे 12 अपक्ष आणि लहान पक्षांव्यतिरिक्त 40 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. एकनाथ शिंदे सध्या बंडखोर आमदारांच्या गटासह आसाममधील गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.

बंडखोर आमदार कर्मचारी आणि सुरक्षेशिवाय गुजरातमध्ये पोहोचले होते

महाराष्ट्र सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएलसी निवडणुकीनंतर बंडखोर आमदार गुजरातच्या दिशेने जात असताना त्यांनी सुरक्षा रक्षक किंवा पीए सारख्या कोणत्याही सपोर्ट स्टाफला सोबत घेण्यास नकार दिला. त्यामुळे सुरक्षा कर्मचारी आणि सपोर्ट स्टाफला आमदारांच्या हालचालींची माहितीच पडली नाही. त्यामुळेच सरकार सुरक्षा कर्मचारी किंवा पीए कर्मचाऱ्यांवर सध्या कोणतीही कारवाई करत नाही. त्यात मोठी बाब म्हणजे कर्मचाऱ्यांनी ही माहिती नियंत्रण कक्षात दिली होती, त्याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगण्यात आले की, 'एकनाथ शिंदे 5 आमदारांसह गुजरातला जात आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT