Raigad Fort
Raigad Fort Twitter/@YuvrajSambhaji
महाराष्ट्र

गड किल्ल्यांवर जाणाऱ्या पर्यटकांना संभाजीराजेंचा सल्ला

दैनिक गोमन्तक

कोल्हापूर : पावसाच्या सरी बरसल्याने संपू्र्ण निसर्गाने हिरवी शाल पांघरली आहे. आणि निसर्गाचे हे विलोभनिय रूप पाहण्यासाठी नदी, दऱ्या डोंगर हिंडण्यासाठी पर्यटन प्रेमी बाहेर निघाले आहेत. मात्र कोरनाने या सगळ्या पर्यटकांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे राज्य शासनाने पर्यटनावर बंदी घातली होती. (Sambhaji Raje Chhatrapati has appealed to the tourists in terms of safety by tweeting)

वर्षा पर्यटन म्हटल की, अनेकजण डोंगरदऱ्या, जंगल सफारी, गड-किल्ल्यांची सैर करतांना दिसतात. याशिवाय पर्यटनासाठी पावसाळ्यात भरून वाहणाऱ्या विविध धबाधब्यांनाही आवर्जून भेटी दिल्या जातात. अनेकजण रांगणा, रायगड, सिंहगड, वासोटा अशा किल्ल्याच्या ट्रेकींगचा प्लॅन करतात. मात्र अशावेळी आपलीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.

महाराष्ट्र राज्यसरकाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच पर्यटनाच्या ठिकाणांवरील आणि किल्ल्यांवरील सफारीचे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी बंद असणारा दुर्गराज रायगड आणि रायगड जिल्हा प्रशासनाने सुरू केला आहे. मात्र यासंदर्भात पर्यटकांच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करुन पर्यटकांना आवाहन केले आहे. (Sambhaji Raje Chhatrapati has appealed to the tourists in terms of safety by tweeting)

नुकताच रायगड जिल्हा प्रशासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांसाठी बंद असणारा दुर्गराज रायगड सुरू केलेला आहे. मात्र रायगडावर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गडचढणीच्या मार्गावर मोठमोठे दगड कोसळत आहेत. तसेच पाण्याचा तीव्र प्रवाह पायरी मार्गावरून वाहत असतो. अशा परिस्थितीत गड पायी चढणे अत्यंत धोकादायक होऊ शकते. हे दगड हटविण्याचे काम प्राधिकरणाच्या वतीने सुरूच आहे. मात्र, तरीही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिवभक्तांनी पावसाळ्यामध्ये गड पायी चढणे टाळावे, असे संभाजीराजे यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. त्यांनी ट्वीटमधून पर्यटक, ट्रेकर्स यांना पावसाळ्यात गड पायी चढण्याची रिस्क घेवू नये असे आवाहन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

SCROLL FOR NEXT