Sadabhau Khot Jitendra Awhad Dainik Gomantak
महाराष्ट्र

सदाभाऊ खोत,तुमच्यात हिंमत असेल तर...; जितेंद्र आव्हाडांचं खुलं आव्हान

''केतकीची ''ती'' भुमिका मान्य असेल तर शिवाजी पार्कवर राहून म्हणून दाखवा''

दैनिक गोमन्तक

केतकी चितळेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर तीच्यावर पोलीसांनी कारवाई केली आहे. तीच्या अडचणीत अजुनही वाढच होत आहे. या प्रकरणावरुन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेचं कौतुक केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सदाभाऊ खोत यांना खुलं आव्हान दिलं आहे. (Sadabhau Khot, if you have the courage ...; Open challenge of Jitendra Awhad )

घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर मध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी भाजपावर टीका करतानाच केतकी चितळे प्रकरणावरून सदाभाऊ खोतांना आव्हान दिले कि, “मला सदाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे. त्यांनी हिंमत असेल तर त्यांनी उत्तर द्यावं.

केतकीने जे बाबासाहेबांबद्दल लिहिलंय, तिनं जे महात्मा फुलेंबद्दल लिहिलंय, जे बौद्ध बांधवांबद्दल लिहिलंय त्याबाबत तिच्यावर अॅट्रॉसिटिचा गुन्हा दाखल झालाय. यावरून ती कणखर मनाची आहे असं तुम्ही मानताय का ? तिला माझं समर्थन आहे असं म्हणण्याची तुमच्यात हिंमत आहे का ?

मान्य असेल तर मग या, शिवाजी पार्कवर एकटे उभे राहून म्हणून दाखवा की माझं केतकीला समर्थन आहे. मी तिनं काय काय लिहिलंय याची संपुर्ण पोस्ट टाकणार आहे. तिची मानसिकता काय आहे, ती लिहिते कशी याकडे फक्त ती स्त्री आहे म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रचंड आत्मप्रौढीपणा तिच्यात ठसठसून भरलाय”, असं आव्हाड म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GDS Recruitment: 'कोकणी भाषा येते?' गोंयकारांसाठी उघडलंय रोजगाराचं दार, पोस्टात काम करण्याची संधी; वाचा माहिती

Goa Nestle Case : नेस्लेला मोठा दिलासा! 300 कोटींच्या तक्रारीवर पडदा; "मॅगी सॉस घोटाळा" CCI ने फेटाळला

Pakistan Terror Attack: पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला, लेफ्टनंट कर्नल, मेजरसह 11 ठार; 'या' दहशतवादी गटाने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कारखाली पोलिस कॉन्स्टेबल चिरडला? भाजपने शेअर केला व्हिडिओ Watch

Goa Crime: गोवा कॅसिनोचा नाद नडला! जुगार खेळण्यासाठी लुटले 30 लाख; दिल्लीत सोनारासह चौघे जेरबंद

SCROLL FOR NEXT