Gunaratne Sadavarte Dainik Gomantak
महाराष्ट्र

गुणरत्न सदावर्तेंची जीभ कापणाऱ्याला 11 लाखांचे बक्षीस

गुणरत्न सदावर्तेंची सनद रद्द करण्याची मागणी

दैनिक गोमन्तक

राष्ट्रवादीचे सर्वासर्वे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी 8 एप्रिलला एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. दरम्यान पहिल्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याच काम वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

दरम्यान, आज बारामतीत एमआयडीसी व टेक्स्टाइल पार्कच्या महिलांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवत आंदोलन (Movement) केले. यावेळी कामगार नेते तुकाराम चौधरी यांनी खळबळजनक वक्तव्य केले. सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस त्यांनी जाहीर केले आहे.

सदावर्तेंची सनद रद्द करा

राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या प्रवक्त्या अॅड हेमा पिंपळे यांनी गुणरत्न सदावर्ते व जयश्री पाटील यांची सनद रद्द करावी अशी मागणी केली आहे. अॅड हेमा म्हणाल्या की ," सदावर्ते व जयश्री पाटील हे गुन्हेगारी, प्रक्षोभक, विध्वंसक, चिथावणीखोर मार्ग वकिलीचा वापर करतात. तसेच विशिष्ट प्रतिष्ठितांना टार्गेट करून असंविधानिक भाषा वापरून समाजाला वेठीस धरतात म्हणून त्यांची सनद रद्द करा."

दुसरीकडे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी माने साखळकर यांनी देखील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्द करण्याची लेखी तक्रार बार कौन्सिलकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT