Reservation row in Maharashtra: Sambhaji Raje makes aggressive statement Dainik Gomantak
महाराष्ट्र

"दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो" आरक्षणावरून संभाजीराजे आक्रमक!

राज्यात (Maharashtra) मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation ) विषय पुन्हा एकदा पेटताना पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

राज्यात (Maharashtra) मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation ) विषय पुन्हा एकदा पेटताना पाहायला मिळत आहे. कारण “दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो पण आपल्याला ते करायचे नाही” असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती (Chatrapati Sambhaji Raje) यांनी काल पुण्यात बोलताना दिला आहे.यापूर्वी त्यांनी राज्य सरकारला (Maharashtra Government) आरक्षणासाठी एक महिन्याचा अल्टिमेट दिला होता पण त्या दृष्टीने सरकार काहीच पावले उचलताना उचलताना दिसत नाही, त्यामुळे संभाजीराजे अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. तसेच काल पुण्यात बोलताना संभाजीराजेनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देत पुढील मूक मोर्चा हा नांदेड येथे होणार असल्याची घोषणा केली आहे.(Reservation row in Maharashtra: Sambhaji Raje makes aggressive statement)

खासदार संभाजी राजे छत्रपती पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीमध्ये बोलत होते.यावेळी त्यांनी आरक्षणाविषयी आमची भूमिका समांजस्याची असल्याचे सांगितले आहे. आरक्षणासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत आपल्याला अशाच एकजुटीने लढायचं आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचे आहे. असे आवाहानही त्यांनी सर्व समाजाला केले आहे.

त्याचबरोबर त्यांनी अनेक मुद्दे काल बोलताना मांडले आहेत. त्यातीलच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जुलै महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या या भेटीनंतर राज्यात अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या काहीजणांनी तर ते मॅनेज झाले अशी टीका केली होती.टीकेला प्रतिउत्तर देताना त्यांनी छत्रपती असे नाही मॅनेज होणारे नाहीत ज्या दिवशी महाराज मॅनेज होतील त्या दिवशी घरी जाऊन बसेल असे म्हणत त्यांनी टीका करणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

यापूर्वी राज्य एक बैठक घेत आपल्या ज्या 22 मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते त्याचे नेमके काय झाले असा सवाल करत संभाजी राजेंनी सरकारला सरकारला धारेवर धरल आहे. मराठा आरक्षणासाठी 2 मूक आंदोलनं झाली पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आल्याने आम्ही थांबलो पण आता आम्ही शांत बसणार नाही आम्ही पुन्हा एकदा आंदोलनाला सुरूवात करत आहोत आणि पहिला मूक आंदोलन 22ऑगस्ट रोजी नांदेड येथे होणार असल्याची घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT