Maharashtra: राज्यात मॉल, रेस्टॉरंट, मंदिरे होणार खुली ?

हॉटेल (Hotel) , मॉल (Mall) आणि मंदिरे (Temples) यावर असणारे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यावर टास्क फोर्समधील (Task Force) सदस्यांचे एकमत झाले आहे.
राज्यात मॉल, रेस्टॉरंट, मंदिरे होणार खुली
राज्यात मॉल, रेस्टॉरंट, मंदिरे होणार खुली Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात कोरोनाची लाट (Corona wave) ओसरल्यामुळे निर्बंध (Restrictions) शिथिल करण्यात आले आहे. लसीचे दोन डोस घेण्याची सक्ती मुख्यमंत्र्यांकडून या बैठकीत करण्यात आली आहे. तसेच हॉटेल(Hotel) , मॉल (Mall) आणि मंदिरे (Temples) यावर असणारे निर्बंध (Restrictions) काही प्रमाणात शिथिल करण्यावर टास्क फोर्समधील(Task Force) सदस्यांचे एकमत झाले आहे. राज्यांत कोरोनाची तिसरी लाट (Corona Third wave) आल्यास पुन्हा निर्बंध (Restrictions) घालण्यासाठी कोणते निकष असावेत याविषयी सविस्तर नियमावली (Rules) तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले.

राज्यात मॉल, रेस्टॉरंट, मंदिरे होणार खुली
सह्याद्री अतिथीगृहाच्या फक्त डागडुजीसाठी महाराष्ट्र सरकारची कोट्यवधींची उधळपट्टी

टास्क फोर्सच्या आजच्या बैठकीमध्ये संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राज्यात ऑक्सीजनची आवश्यकता, लसीकरणामध्ये आणि ट्रेसिंगमध्ये वाढ तसेच पुढील काळात अनेक क्षेत्रांमध्ये सावधानता बाळगून, निर्बंधात शिथिलता आणायला हवी यावर चर्चा झाली. आज झालेल्या बैठकीत दिलेल्या सुचनांप्रमाणे टास्क फोर्स एक नियमावली तयार करणार आहे.

राज्यात मॉल, रेस्टॉरंट, मंदिरे होणार खुली
महिलेच्या अंगावर 'प्रेमपत्र' फेकणे हा गुन्हाच; 2 वर्ष फोडावी लागु शकते 'खडी'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, मेहुल मेहता, डॉ. झहीर विराणी, डॉ. राहुल पंडित, वसंत नागवेकर, डॉ. सुहास प्रभू, डॉ.अजित देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास बैठकीत उपस्थित होते.

राज्यात मॉल, रेस्टॉरंट, मंदिरे होणार खुली
राज्यातील भाजप नेते दिल्ली दरबारी, पक्षसंघटनेत खांदेपालट ?

मुख्यमंत्र्यांनी मुंबई शहरात 15 ऑगस्टपासून लोकल सुरू होणार अशी घोषणा केली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com