Vengurla Beach Dainik Gomantak
महाराष्ट्र

सिंधुदुर्गात सापडला पाण्यावर तरंगणारा दुर्मीळ 'प्युमिस' दगड

दुर्मीळ 'प्युमिस' दगडांना रामसेतुंचा दगड देखील म्हटले जाते.

Pramod Yadav

Pumice Rock found In Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर पाण्यावर तरंगणारा दुर्मीळ 'प्युमिस' दगड सापडला आहे. समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करत असताना घुंगुरकाठी सिंधुदुर्ग (Sindhudurg) संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ.सई लळीत यांना हा दगड सापडला आहे.

मी आत्तापर्यंत ज्याच्या शोधात होतो तोच हा दुर्मीळ दगड आहे. असे या दगडाचे वर्णन जागतिक किर्तीचे भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. एम के प्रभू यांनी केले आहे.

'प्युमिस' दगड हा ज्वालामुखीजन्य सच्छिद्र खडक (porous volcanic rock) आहे. हा दगड या भागात अतिशय दुर्मीळ आहे. समुद्रात पाण्याखाली ज्वालामुखीचा स्फोट (volcanic rock) होतो तेव्हा पृथ्वीच्या अंतर्भागातून लाव्हारस प्रचंड वेगाने आकाशात उंच फेकला जातो. लाव्हा खाली येत असताना तो घट्ट होण्याची प्रक्रिया सुरू होते. लाव्हा घट्ट होऊन त्याचे दगडात रूपांतर होण्यापूर्वी त्यात असंख्य छिद्रे तयार होतात.

'प्युमिस' दगडाचे प्रमाण केवळ दहा टक्के असते व आकारमानात 90 टक्के भाग हा पोकळ असतो. त्यामुळे दिसायला मोठा असला तरी हा दगड वजनाने हलका असतो.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध किणाऱ्यांना आम्ही भेट देत असतो, दरम्यान, वेंगुर्ले तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर पाण्यावर तरंगणारा दुर्मीळ दगड सापडला असे लळीत म्हणाले. पाण्यावर तरंगणारा हा दगड एक भौगोलिक चमत्कार आहे.

प्युमिस दगडाला पौराणिक पार्श्वभूमी देखील आहे. रामायणातील एका प्रसंगात श्रीरामाने व त्याच्या वानरसेनेने रावणाच्या लंकेत जाण्यासाठी जो सेतू बांधला त्यासाठी पाण्यावर तरंगणारे दगड बांधले असा उल्लेख आहे. त्यामुळे दुर्मीळ 'प्युमिस' दगडांना रामसेतुंचा दगड देखील म्हटले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तायट जावनन ते कितें उलयतात; 'सोपो'वरुन फोंडा पालिका कर्मचाऱ्याची मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका; Watch Video

Voter Adhikar Yatra: 'मतदार अधिकार यात्रे'ने राहुल गांधींना बळ, पण फायदा काँग्रेसऐवजी मित्रपक्षांना

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Goa Live News: "‘शंभर रुपये एका दिवसाचे; उद्याही पुन्हा पैसे द्यावे लागणार"

SCROLL FOR NEXT