Raj Thackeray criticises Mumbai Goa Highway: Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: चांद्रयान 600 कोटींत चंद्रावर गेले; 15000 कोटी खर्च होऊनही मुंबई-गोवा हायवे अपूर्ण का?

राज ठाकरेंचा सवाल; एकनाथ शिंदे सरकारवर डागली तोफ

गोमंतक ऑनलाईन टीम

Raj Thackeray criticises Mumbai Goa Highway: गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला विविध सवाल करत धारेवर धरले आहे. रविवारीही मनसे प्रमुखांनी पदयात्रेचे आयोजन केले होते.

या पदयात्रेत रायगड आणि रत्नागिरीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्या शैलीत तोफ डागताना चांद्रयान 600 कोटींत चंद्रावर पोहचले पण मुंबई-गोवा महामार्गावर 15000 कोटी खर्च होऊनही अद्यापही हा रस्ता अपूर्ण असल्याची टीका केली.

पदयात्रेच्या समारोपप्रसंगी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोलार येथे उपस्थितांना संबोधित केले. राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण न केल्याबद्दल एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला.

राज ठाकरे म्हणाले की, 'चांद्रयान 3 600 कोटींमध्ये चंद्रावर पोहोचले आणि 15 हजार कोटी खर्च करूनही मुंबई-गोवा महामार्ग गेल्या 12 वर्षांत बनलेला नाही. जनतेची लूट करणाऱ्यांना आपण सत्ता देत आहोत, ही विचार करण्याची बाब असल्याचे ते म्हणाले.

याचा विचार करा. हा रस्ता 12 वर्षापासून बनतोय. पण आजतागायत पूर्ण झालेला नाही. त्याचे काम अपूर्ण आहे. हा रस्ता न बनण्याचे कारण म्हणजे, कारण या रस्त्याच्या आसपासच्या जमिनी काही लोकांनी अत्यंत कवडीमोल भावात विकत घेतल्या आहेत.

आता जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल, तेव्हा याच जमिनी शंभर पट महागड्या करून विकतील. त्यात त्यांचा फायदा आहे. पण सर्वसामान्य कोकणवासीयांचे काय? त्याला काय मिळाले? असा सवालही त्यांनी केला.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम 2007 मध्ये सुरू झाल्याचे राज ठाकरे त्यावेळी म्हणाले होते. त्यानंतर अनेक सरकारे आली, पण रस्त्यांची कामे झाली नाहीत आणि तरीही तेच लोक कसे निवडून येतात? रस्ते खड्ड्यात गेले की आपण खड्ड्यात गेलो? आमच्या मतदारांना काळजी नाही?

केवळ कोकणच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुंबई ते नाशिक प्रवास करण्यासाठी 8 तास लागतात. या रस्त्यावरून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: भानु सप्तमी आणि अधिकमासाचा महासंयोग! आजपासून 'या' राशींचे सुवर्णदिवस सुरू, होणार प्रचंड धनलाभ

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

SCROLL FOR NEXT