MNS

 

Dainik Gomantak

महाराष्ट्र

'राजप्रेम' राज ठाकरेंनी कार्यकर्त्याच्या सुजलेल्या हातावर लावला मलम!

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्वत: राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्याच्या सुजलेल्या हाताला मलम लावताना दिसून येत आहे.

दैनिक गोमन्तक

राज ठाकरेंच्या नावावर ज्या नेत्यांनी आमदारकी मिळवली त्या नेत्यांनी नंतर मनसे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत अनेक नेत्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली पण तळागाळातला कार्यकर्ता अजूनही त्यांच्यासोबत आहे. यामागचं कारण काय असा अनेकांना प्रश्न पडतो. त्याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्वत: राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्याच्या सुजलेल्या हाताला मलम लावताना दिसून येत आहे.

मनसेची (Maharashtra Navnirman Sena) एक महत्त्वाची बैठक मुंबईत सुरु होती. या बैठकीला सर्व नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठक सुरु असताना अचानक मनसे कामगार नेते डॉ. मनोज चव्हाण यांचा हात दुखू लागला. त्यांच्या हाताला सूज आल्याने त्यांना वेदना होत होत्या. त्यामुळे डॉ. मनोज चव्हाण यांना बैठकीतून निघून जाण्याची वेळ आली होती, मात्र ही बाब राज ठाकरेंच्या लक्षात येताच त्यांनी डॉ. मनोज चव्हाण यांची आपुलकीने विचारपूस केली.

त्यानंतर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) स्वत: डॉ. मनोज चव्हाण यांच्या सुजलेल्या हातावर मलम लावला. या वेळी डॉ. मनोज चव्हाण हे भारावून गेल्याचेही या व्हिडीओ मध्ये स्पष्ट पणे दिसुन येत आहे. राज ठाकरेंनी (MNS) अगदी घरच्या व्यक्तीप्रमाणे काळजी घेतल्याने डॉ. मनोज चव्हाण यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आतापर्यंत एखादा कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी काहीही करु शकतो याची प्रिचिती सर्वांनाच अनेकदा आली आहे. पण राज ठाकरेंच्या या कृत्यामुळे नेताही आपल्या कार्यकर्त्यासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी काहीही करु शकतो हे स्पष्ट झालंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT