Raj Thackeray: Fadnavis is not a surname Dainik Gomantak
महाराष्ट्र

'फडणवीस हे काही आडनावं नाही': राज ठाकरे

राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी आज बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिम्मित पुण्यात त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या

दैनिक गोमन्तक

राज ठाकरेंचा(Raj Thackeray) मिश्किल स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे, ते मंचावरचे भाषण असुद्या किंवा पत्रकारांना दिलेले उत्तर असुद्या प्रत्येक वेळेस ते आपल्या खास ठाकरे शैलीत काहींना काही असे उत्तर देतात की त्यातून विरोधकांवर न कळत टीका होते. त्यात अगदी आजचच उदाहरण घ्यायचे झाले तर देवेंद्र फडणवीस यांच्या आडनांवर त्यांनी इतिहासाची साक्ष देत आपल्या खास शैलीत उत्तर दिले. फडणवीस हे काही मूळचे आडनाव नाही, ते मुळचे पर्शियन नाव आहे जे आहे फरदवणीस. याचा अर्थही राज ठाकरेंनी समजावून सांगितले आहे.फर्द म्हणजे कागद आणि नवीस म्हणजे लिहिणारा म्हणजेच कागदावरती लिहिणारा असा अर्थ सांगत त्यांनी इतिहासाचा दाखला दिला.

राज ठाकरे यांनी आज बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिम्मित पुण्यात त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांना भेटल्यानंतर, त्यांच्या सोबतच्या भेटीत इतिहासाबद्दल नेहमीच नवीन माहिती मिळते ते फक्त शिवचरित्र सांगत नाही तर आजच्या घटनांना इतिहासाचा दाखला देत त्या समजावून सांगतात हेच सांगताना राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आडनावाचा अर्थ समजावून सांगितला. बाबासाहेब पुरंदरे यांनी कधीच इतिहासाला धक्का लावलेला नाही. त्यांनी फक्त खरं तेच सांगितलं. त्यांनी दंतकथा मांडल्या नाहीत, अशा शब्दात बाबासाहेब पुरंदरे यांचं कौतुकही केलं आहे.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषेदत राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला आहे काही दिवसांपासुन भाजपा आणि मनसे एकत्र येणार का अशा चर्चा रंगल्या असतानाच नाशिक येथे राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली होती त्यांनतर या चर्चांना अधिकच उधाण आले होते आणि आपल्या भाषणाच्या काही व्हिडिओ क्लिप राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना पाठवल्या अशी बातमीही अली होती,परप्रांतीयांबद्दलची भूमिका मनसे आणि भाजपमधील युतीत अडथळा आणत आहे यावर बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

क्लिप वरून सूत जुळवू नका

'चंद्रकांत पाटील यांनी परप्रांतीयांबद्दलच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्यावर मी याबद्दलची माझी भूमिका स्पष्ट करणारी एक लिंक पाठवेन, असं त्यांना सांगितलं होतं. मात्र अद्याप तरी मी त्यांना क्लिप पाठवलेली नाही. तुम्ही त्या क्लिपवरून सूत जुळवू नका,' असं राज ठाकरे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT